kolhapur news police raid Panhalgad many girlfriends and boyfriends arrested  Saam TV
महाराष्ट्र

Panhala Fort: पन्हाळगडावर अचानक पोलीस धडकले; अनेक प्रेमीयुगुलं सापडली, पुढे काय झालं? पाहा VIDEO

Panhala Fort News: पोलिसांनी गडावर धडक मारताच प्रेमीयुगुलांची चांगलीच धांदल उडाली. यावेळी घरी न सांगता पन्हाळगडावर फिरायला आलेल्या प्रेमी युगलांची पोलिसांनी चौकशी केली.

Satish Daud

रणजित मांजगावकर, साम टीव्ही

Panhala Fort Latest News

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आवडता किल्ला असलेल्या पन्हाळगडावर दररोज शेकडो पर्यटक येत असतात. शिवकालिन स्वराज्यातील ऐतिहासिक असा किल्ला म्हणून पन्हाळगडाची ओळख आहे. मात्र, काही दिवसांपासून गडावर प्रेमीयुगुलांचा वावर वाढला आहे. गडावर फिरण्यासाठी आलेल्या प्रेमीयुगुलांकडून अश्लिल चाळे केले जात आहेत. (Latest Marathi News)

शुक्रवारी (७ ऑक्टोबर) दुपारच्या सुमारास एका प्रेमीयुगुलाने गडावरुन उडी घेत थेट आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच शनिवारी अचानक निर्भया पथकाने गडावर धडक मारली. पोलिसांनी (Police) गडावर धडक मारताच प्रेमीयुगुलांची चांगलीच धांदल उडाली.

यावेळी घरी न सांगता पन्हाळगडावर फिरायला आलेल्या प्रेमी युगलांची पोलिसांनी चौकशी केली. तसेच अनेक प्रेमीयुगुलांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं. यापुढे परवानगी घेऊनच पन्हाळगडावर फिरायला या, असा सज्जड दम पोलिसांनी प्रेमीयुगुलांना दिला.

शुक्रवारी पन्हाळगडावर नेमकं काय घडलं?

पन्हाळगडावर फिरायला आलेल्या एका प्रेमीयुगुलाने शुक्रवारी दुपारच्या सुमारास गडावरुन उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. दोघांनीही एकमेकांचे हात हातात घेऊन गडावरुन दरीत उडी मारली. ही बाब गडावर फिरण्यासाठी आलेल्या काही पर्यटकांच्या लक्षात आली.

त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस गडावर दाखल झाले. पोलिसांनी दरीत पडलेल्या प्रेमीयुगुलांना बाहेर काढत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. हे प्रेमीयुगुल राधानगरी तालुक्यातील एकाच गावातील असल्याची माहिती आहे. गेली काही वर्ष दोघे एकत्रित ट्रेकिंग करत होते.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

SCROLL FOR NEXT