Beed News: विवाहितेवर पतीसह सासऱ्याचा अनैसर्गिक अत्याचार, बीडमधील संतापजनक घटना

Beed Crime News: आरोपींनी पीडित महिलेचे हातपाय बांधले. तसेच तिच्या तोंडात बोळा कोंबून अनैसर्गिक अत्याचार केला.
married woman Physical abuse by husband and father-in-law in Beed City
married woman Physical abuse by husband and father-in-law in Beed CitySaam TV
Published On

Beed Crime News

बीड शहरातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. गुप्तधन काढण्यासाठीच्या पूजेला बसण्याचा विरोध केल्यानंतर एका महिलेवर पतीसह सासऱ्याने अनैसर्गिक अत्याचार केला आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून शहरातील शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

married woman Physical abuse by husband and father-in-law in Beed City
Palghar News: खळबळजनक! आधी चिरला तरुणीचा गळा; नंतर स्वत:लाही संपवलं, तरुणाच्या कृत्याने पालघर हादरलं

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी गुप्तधन काढण्यासाठी घरात पूजा मांडली होती. या पूजेला बसण्यासाठी आरोपींनी पीडितेला आग्रह केला. मात्र, या गोष्टीला पीडित महिलेने विरोध केला. त्यामुळे पती आणि सासऱ्यांनी तिला बेदम मारहाण केली.

आरोपी इतक्यावरच थांबले नाही, तर त्यांनी पीडित महिलेचे हातपाय बांधले. तसेच तिच्या तोंडात बोळा कोंबून अनैसर्गिक अत्याचार (Crime News) केला. या संपूर्ण प्रकारानंतर पीडित महिलेने पोलिसांत धाव घेत आपल्यासोबत घडलेला प्रकार पोलिसांसमोर कथन केला

दरम्यान पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पीडितेचा पती, सासरा, नणंद, नंदावा यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार व जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींना अटक देखील केली आहे. या घटनेनं परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.

married woman Physical abuse by husband and father-in-law in Beed City
Pune News: ग्रामपंचायत सदस्याची भर रस्त्यात निर्घृण हत्या; थरारक घटनेनं खेड हादरलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com