Kolhapur, Ajit Pawar, Rs 2000, Notebandi
Kolhapur, Ajit Pawar, Rs 2000, Notebandi saam tv
महाराष्ट्र

Ajit Pawar On NoteBandi : नाेटाबंदीच्या निर्णयावर अजित पवार म्हणाले, हे सारखं सारखं का घडतयं... (पाहा व्हिडिओ)

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Ajit Pawar News : आरबीआयने (reserve bank of india) दाेन हजार रुपयांची (rs 2000) नाेट चलनातून काढून घेण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. या निर्णयावरुन देशासह राज्यात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. वारंवार नाेटाबंदीचा का निर्णय घेतला जात आहे. हे जर देशाच्या भल्याकरिता असेल तर जरुर घेतला पाहिजे परंतु हा निर्णय का घेतला गेला हे आरबीआयने स्पष्ट केले पाहिजे असे विराेधी पक्ष नेते अजित पवार (ajit pawar reacts on rs 2000 notebandi) यांनी नमूद केले. ते काेल्हापूरातील एका कार्यक्रमात बाेलत हाेते. (Maharashtra News)

अजित पवार म्हणाले पूर्वी नोटा बंद झाल्या त्यावेळी लोकांनी खूप काही सहन केलं. या नोटबंदीमधून काळा पैसा बाहेर येईल आणि डुप्लिकेट नोटांना आळा बसेल असे सर्वसामान्यांना वाटलं होतं. त्यामुळे त्यांनी ते सहन केलं.

अजित पवार म्हणाले आता दोन हजार रुपयांच्या नोटबंदीचा निर्णय घेतला गेला आहे. तीन महिन्यात या नोटा बंद होणार असल्याने लोकांना फार त्रास होईल असं वाटत नाही. अनेक महिने दोन हजार रुपयांच्या नोटा छपाई बंद झाली होती याबद्दल अधिकारवाणीने आरबीआय सांगू शकेल असेही पवार यांनी नमूद केले.

दरम्यान बीड जिल्ह्यातील महिलेवर घडलेल्या अतिप्रसंगाबाबत विराेधी पक्ष नेते अजित पवार म्हणाले पोलीस खातं ज्यांच्याकडे आहे, त्या देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस खात्यात आदरयुक्त दबदबा निर्माण केला पाहिजे. गुन्हेगारांवर कारवाई करणाऱ्या अधिकारी वर्गाला प्रोत्साहन दिले तरच बलात्कारांसारख्या गोष्टी थांबू शकतात, गुन्हेगारी थांबू शकेल असेही पवार यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha Voting Live: रवींद्र वायकर यांना मतदार केंद्रात जाण्यापासून रोखलं, अरे डेअरी येथील मतदान केंद्राबाहेर शिवसेनेचे अनेक पदाधिकारी जमले

Ruchira Jadhav: सुपर हॉट रुचिरा; कहर लूकने उडवली झोप!

Pune Hit and Run Case: देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्शन मोडमध्ये; कारचालकावर कठोर कारवाईच्या सूचना

Kolhapur Rain News | कोल्हापुरात अवकाळी पावसाची हजेरी, अनेक ठिकाणी झाडं कोसळली

Rinku Rajguru: रिंकूच्या निरागस अदा; लूकपेक्षा चाहत्याच्या खास कमेंटचीच चर्चा

SCROLL FOR NEXT