Kolhapur News Married Women Ended her life journey by hanging himself karvir taluka kothali village Saam TV
महाराष्ट्र

Kolhapur News: मुलगा होत नसल्याने सासरच्या मंडळींकडून छळ; जाचाला कंटाळून विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल

Kolhapur Crime News: सासरच्या मंडळींच्या छळाला कंटाळून विवाहितेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

Satish Daud

रणजित मांजगावकर, साम टीव्ही

Kolhapur Marrired Death Women News

लग्नाला १३ वर्ष होऊन देखील मुलगा होत नसल्याने सासरच्या मंडळींनी विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला. या छळाला कंटाळून विवाहितेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही दुर्देवी घटना कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात रविवारी रात्रीच्या (२४ सप्टेंबर सुमारास घडली.  (Latest Marathi News)

अस्मिता केदारी चौगुले, (वय 30, रा. कोथळी, ता. करवीर) असं मृत विवाहितेचं नाव आहे. याप्रकरणी मृत महिलेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पतीसह सासू -सासऱ्यांवर करवीर पोलीस (police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 13 वर्षापूर्वी अस्मिता आणि केदारी यांचा विवाह झाला होता. लग्नानंतर अस्मिताने दोन गोंडस मुलींना जन्म दिला. मात्र, अस्मिताचा पती केदारी आणि सासू-सासऱ्यांना मुलगाच हवा होता. घरात वंशाचा दिवा हवा म्हणून त्यांनी अस्मिताचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला.

गेल्या कित्येक वर्षांपासून अस्मिता सासरच्या मंडळींकडून होणारा छळ सहन करत होती. मात्र, रविवारी रात्री तिच्या संयमाचा अंत झाला. पती आणि सासू-सासऱ्यांसोबत वाद झाल्यानंतर अस्मिताने कोथळी (Kolhapur News) येथील राहत्या घरी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.

दरम्यान, अस्मिताच्या आत्महत्येची बातमी कळताच तिच्या माहेरच्या मंडळींना तातडीने कोथळी गावात धाव घेतली. जोपर्यंत सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल होत नाही. तोपर्यंत आम्ही अस्मितावर अंत्यविधी करणार नाही, अशी भूमिका अस्मिताच्या आई-वडिलांनी घेतली होती. अखेर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत अस्मिताचा पती केदारी आणि सासू सासऱ्यांना अटक केली आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT