Shakitipeeth Expressway: Saamtv
महाराष्ट्र

Shaktipeeth Expressway : 'शक्तिपीठ महामार्गा'विरोधात सर्वपक्षीय नेत्यांचे शक्तिप्रदर्शन! कोल्हापुरात निघणार विराट मोर्चा; का होतोय विरोध? बघा VIDEO

Shaktipeeth Expressway: समृद्धी महामार्गानंतर शिंदे- फडणवीस सरकारचा महत्वाकांशी प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा शक्तीपीठ महामार्गाला मोठा विरोध होत आहे. आज याविरोधात सर्वपक्षीय नेते कोल्हापुरमध्ये विराट मोर्चा काढणार आहेत. काय आहे शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प? काय होतोय विरोध; जाणून घ्या सविस्तर.

Gangappa Pujari

रणजित माजगावकर| कोल्हापूर, ता. १८ जून २०२४

राज्य सरकारच्या बहुचर्चित नागपूर- गोवा शक्तिपीठ महामार्गाला मोठा विरोध होत आहे. आज या महामार्गाला विरोध करण्यासाठी कोल्हापूरमध्ये सर्वपक्षीय नेते, तसेच सामाजिक संघटनांचा विराट मोर्चा निघणार आहे. कोल्हापुरचे नवनिर्वाचित खासदार शाहू महाराज छत्रपती, काँग्रेस नेते सतेज पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आदी नेते यामध्ये सहभागी होणार आहेत.

'शक्तीपीठ'विरोधात विराट मोर्चा

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नागपूर- गोवा शक्तिपीठ महामार्गाविरोधात आज कोल्हापुरमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी विराट मोर्चाचे आयोजन केले आहे. कोल्हापूर, सांगली, नांदेड जिल्ह्यातील हजारो शेतकरी शक्तीपीठ महामार्गा विरोधात या मोर्चात सहभागी होणार आहेत. आज सकाळी अकरा वाजता दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावरुन हा विराट मोर्चा निघणार असून खासदार शाहू महाराज छत्रपती, काँग्रेस नेते बंटी पाटील, राजू शेट्टी आदी नेते या मोर्चामध्ये सहभाही होणार आहेत.

का होतोय विरोध?

राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प समजला जाणारा शक्तिपीठ महामार्ग सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या महामार्गाला कोल्हापुरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमधून मोठा विरोध पाहायला मिळत आहे. या महामार्गासाठी २७ हजार हेक्टर जमिन अधिग्रहीत करण्याची योजना आहे. मात्र या जमिनी बागायती पट्ट्यात येत असल्याने त्यास शेतकरी, सामाजिक संघटना, तसेच नेत्यांचा मोठा विरोध होत आहे.

असा असेल महामार्ग!

२०२३ मध्ये समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गाची घोषणा केली होती. तब्बल ८०२ किलोमीटरचा हा हायवे नागपूरपासून थेट गोव्याला जातो. हा महामार्ग वर्धा, यवतमाळ, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर सह १२ जिल्ह्यांमधून जाणार आहे. तब्बल ८६ हजार कोटी इतका अंदाजे खर्च या महामार्गासाठी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amruta Dhongade: अमृताचा बोल्डनेस पाहून तुम्हालाही भरेल हुडहुडी

Param Sundari vs Baaghi 4 : सिद्धार्थ मल्होत्रा अन् टायगर श्रॉफमध्ये कांटे की टक्कर, 'बागी ४'नं ओपनिंग डेलाच केली बक्कळ कमाई

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

'निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी...' गणेश गल्ली, तेजुकाया अन्.. मुंबईतील गणरायाच्या विसर्जनाला सुरूवात

Ganpati Visarjan 2025: मुंबई ते दिल्ली गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी 'हे' आहेत शुभ मुहूर्त; जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT