Kolhapur News  Saam TV
महाराष्ट्र

Kolhapur AAP Protest News : कोल्हापूरकरांचा नाद करायचा नाय! मनपा शाळांच्या दुरावस्थेबद्दल 'आप'चं लक्षवेधी आंदोलन

Kolhapur Protest News : कोल्हापूर शहरातील शाळांच्या दुरावस्थेचा अहवाल वाजत गाजत पालखीमधून महापालिकेला सादर करण्यात आला.

साम टिव्ही ब्युरो

रणजीत माजगावकार

Kolhapur News : कोल्हापूर शहरातील नागरी समस्यांकडे आम आदमी पक्षाच्या वतीने वेगवेगळ्या पद्धतीने आवाज उठवला जातो.प्रशासनाच लक्ष वेधण्यासाठी आपचा हा प्रयत्न असतो. महापालिकेच्या शाळांच्या दुरावस्थेबद्दलही आपने हटके आंदोलन करत लक्ष वेधलं.

महापालिकेच्या शाळांच्या दुरावस्थेकडे महापालिकेनं दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ आपच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांच्या नेतृत्वाखाली लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं. कोल्हापूर शहरातील शाळांच्या दुरावस्थेचा अहवाल वाजत गाजत पालखीमधून महापालिकेला सादर करण्यात आला.

यावेळी शाळांचा दर्जा सुधारण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली. कोल्हापूर महापालिकेच्या शाळांची दर्जा सुधारावा यासाठी शाळांमधील भौतिक सुविधांचे ऑडिट करावे, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने सातत्याने करण्यात येत आहे. (Maharashtra Politics)

परंतु यावर महापालिका प्रशासनाने कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे अखेर आपच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये जात भौतिक सुविधांचा सर्व्हे केला. दरम्यान या सर्व्हेचा अहवाल आज आपने चक्क पालखीतून महापालिकेवर वाजत गाजत सादर केला आहे. (Latest Marathi News)

आपच्या कार्यकर्त्यांनी अहवालाची प्रत पालखीमध्ये सजवून हलगीच्या ठेक्यावर शिवाजी चौकातून पायी जात महापालिका अधिकाऱ्यांना दिली. त्यामुळे या अनोख्या आंदोलनाची चर्चा संपूर्ण शहरात चांगलीच रंगली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal Aditya Rajyog: मंगळादित्य राजयोग सक्रिय होताच पालटणार नशीब; धन, दौलत अन् प्रसिद्ध सर्व काही मिळेल

LSG Vs DC Highlight: दिल्ली कॅपिटल्सने लखनौला धूळ चारली; 6 गडी राखून मिळवला विजय

Thursday horoscope : आर्थिक चणचण जाणवेल, जुने मित्र भेटतील; ५ राशींच्या लोकांचा खडतर काळ संपेल

Ritu Tawde: 'जैनमुनींच्या आशीर्वादानं घसा ठीक झाला', मुंबईचे महापौर अंधश्रद्धेच्या आहारी?

युरियाचा काळाबाजार, शेतकरी बेजार; युरिया काळाबाजाराचा 'साम'वर पर्दाफाश

SCROLL FOR NEXT