Kolhapur Accident News Saam TV
महाराष्ट्र

Kolhapur Accident News: पिठाच्या डब्यात पडल्यानं चिमुकल्या बाळाचा मृत्यू; हृदयद्रावक घटनेनं कोल्हापूर हादरलं

मरण पावलेला चिमुकला फक्त ९ महिन्यांचा होता.

Ruchika Jadhav

Kolhapur Accident News: कोल्हापूरमधून एक अतिशय हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पिठाच्या डब्ब्यात पडून एका गोंडस बाळाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरावर दु:खाची लाट पसरली आहे. (Latest Kolhapur News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कोल्हापूरच्या करवीर तालुक्यात ही दु:खद घटना घडली आहे. यात मरण पावलेला चिमुकला फक्त ९ महिन्यांचा होता. तो वॉकरमध्ये बसून स्वत: चालत होता. अशात चालताना त्याचा तोल गेला आणि समोर असलेल्या पिठाच्या डब्यात तो पडला.

पिठाच्या डब्यात पडल्यावर तो मोठमोठ्याने रडू लगला. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकूण कुटुंबिय धावतपळत त्याच्याकडे आले. त्यांनी लगेच बाळाला रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

बाळ डब्यात पडलं तेव्हा रडू लागल्याने त्याच्या नाकातोंडात पिठ गेलं होतं आणि ते चिकटून राहीलं. यामुळे त्याला श्वास घेता आला नाही. त्यामुळे त्याचा जीव गुदमरू लागला. श्वास कोंडल्याने या बाळाला आपला जीव गमवावा लागला.

लहान मुलांना नेहमीच डोळ्यात तेल घालून संभाळावे लागते. थोडं जरी दुर्लक्ष झालं तरी मोठा अनर्थ होतो. लहान मुलं कधी काय करतील याचा नेम नसतो त्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी सतत एक व्यक्ती त्यांच्याजवळ असणे गरजेचं असतं. मात्र यातूनही थोडं दुर्लक्ष झाल्यास अशा घटना घडताता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र ठरवलं? आदिती तटकरेंनी सांगितली सगळी कारणं

Maharashtra News Live Update: नालासोपाऱ्यात परदेशी महिलेवर हल्ला

भाजप स्लो पॉयझन, शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम करतंय, कामाख्या देवीला माहितीय; माजी मंत्री अब्दुल सत्तारांचा सनसनाटी आरोप

Success Story : अपमानाचे शब्द थेट काळजाला भिडले! रिक्षाचालकाचा मुलगा थेट IAS अधिकारी झाला

Parbhani : विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू; शिंदे गटाच्या उमेदवाराविरोधात ठाकरेंनी उतरवला हुकमी एक्का

SCROLL FOR NEXT