Kolhapur Protest google
महाराष्ट्र

Kolhapur Protest: शक्तिपीठविरोधात शेतकरी पुन्हा रस्त्यावर, शक्तिपीठची ड्रोन सर्वेक्षण मोजणी पाडली बंद

Maharashtra Farmers News: शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापूर आणि सांगलीतले शेतकरी आक्रमक झाले आहेत. कोल्हापुरात मोर्चा काढण्यात आला तर सांगलीत ड्रोन सर्वेक्षण बंद पाडण्यात आलं आहे.

Sakshi Sunil Jadhav

शक्तिपीठ महामार्गाविरोधातला रोष काही केल्या कमी होईना. या महामार्गाविरोधात पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर उतरलाय. कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. तर सांगलीत संतप्त शेतकऱ्यांनी थेट सर्वेक्षण मोजणीच बंद पाडली. शक्तिपीठविरोधात नेमकं काय घडतंय पाहूयात हा रिपोर्ट.

महायुती सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या शक्तीपीठ महामार्गाविरोधात पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत. कोल्हापुरात मविआच्या नेत्यांनी हजारो आंदोलकांसह थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यात महिलांचाही मोठा सहभाग होता. रक्ताचे पाट वाहिले तरी चालतील मात्र शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नसल्याचा निर्धारच मोर्चातल्या आंदोलक महिलांनी व्यक्त केला. त्यामुळे आंदोलनातलं वातावरण चांगलंच तापलं होतं.

तर दुसरीकडे सांगलीत शक्तिपीठ महामार्ग सर्वेक्षण सुरू असताना शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करत ड्रोन मोजणी बंद पाडली. यावेळी बाधित शेतकरी आणि मोजणी अधिकारी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. तर काही शेतकऱ्यांनी सर्व्हेक्षणाला विरोध दर्शवताना थेट अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्य़ामुळे घटनास्थळी काही काळ तणाव निर्माण झाला होता.

कोल्हापूरमधल्या शक्तिपीठ महामार्गाविरोधातील आंदोलनाच्या निमित्तानं मविआची एकजूट दिसून आली.

दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांनी विरोध केलेला शक्तिपीठ महामार्ग कोण-कोणत्या जिल्ह्यामंधून जाणार आहे ते पाहा...

विदर्भातील वर्धा ते कोकणातील बांदापर्यंत एकूण 805 किलोमीटरचा शक्तिपीठ महामार्ग प्रकल्प असणार आहे. राज्यातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 13 जिल्ह्यांतून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे.

खरंतर, आपल्या बागायती जमिनी महामार्गात जाणार असल्यामुळे शेतकरी शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला सातत्याने विरोध करत आहेत. अशातच आता शेतकऱ्यांच्या वाढत्या रोषामुळे मोजणी अधिकाऱ्यांवर अखेर सर्वेक्षण थांबवण्याची वेळ आलीये. राज्यातील शेतकऱ्यांच्या संतप्त भूमिकेमुळे सरकारसमोर नवा पेच निर्माण झालाय. त्यामुळे या सरकार आता या महामार्गाबाबत काय भूमिका घेणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

रणजीत माजगावकर, साम टिव्ही, कोल्हापूर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane : पालकांनो सावधान! मुलांसाठी 'थीम केक' आणताय? ठाण्यातील या धक्कादायक घटनेने उडेल झोप

Heart Age: ४० व्या वर्षीच हृदय म्हातारं का होतंय? डॉक्टरांनी सांगितलेली 'ही' ५ कारणे वाचून थक्क व्हाल

Pune Fort : हिरव्यागार निसर्गात लपलाय इतिहास, वीकेंडला पुण्यातील 'हा' Hidden किल्ला एकदा पाहाच

Maharashtra News Live Update: सातारा जिल्हा परिषदेतील 'त्या' नाट्याचा वचपा काढण्याची हीच वेळ; जयंत पाटलांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Sunetra Pawar : भाषणं होतील, मेळावे होतील, पण प्रत्येक क्षणी...; सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT