KARVEER POLICE SEIZE ILLEGAL GOA LIQUOR WORTH ₹8.77 LAKH IN KOLHAPUR, DRIVER ARRESTED Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur : बंदोबस्तावेळी कार अडवली, दरवाजा उघडताच धक्कादायक प्रकार आला समोर

Kolhapur News : करवीर पोलिसांनी गोव्यातून कोल्हापुरात बेकायदेशीरपणे आणली जात असलेली विदेशी दारू जप्त केली. या कारवाईत ८.७७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Alisha Khedekar

  • करवीर पोलिसांनी गोव्यातून आणली जाणारी अवैध विदेशी दारू जप्त केली

  • कळंबा नाक्यावर जीप अडवली

  • ८ लाख ७७ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल जप्त

  • चालक गजानन दिनकर पाटीलला अटक

रणजित माजगावकर, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात अवैध दारू वाहतुकीविरोधात करवीर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी गोव्यातून बेकायदेशीरपणे विदेशी दारू घेऊन येणाऱ्या एका जीपसह चालकाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत विदेशी दारू, वाहन आणि मोबाईल असा एकूण ८ लाख ७७ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यातून मोठ्या प्रमाणात विदेशी दारू कोल्हापूर शहरात विक्रीसाठी आणली जाणार असल्याची गोपनीय माहिती करवीर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने गारगोटी-कोल्हापूर मार्गावरील कळंबा नाक्याजवळ सापळा रचून संशयित वाहनांची तपासणी सुरू केली.

दरम्यान, गोव्याच्या नोंदणी क्रमांकाची काळ्या रंगाची जीप (जीए-०३-वाई-१३६३) त्या मार्गावरून येताना दिसताच पोलिसांनी तिला थांबवून तपासणी केली. वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये गोवा बनावटीच्या विदेशी दारूचे बॉक्स आढळून आले. यानंतर पोलिसांनी वाहन चालक गजानन दिनकर पाटील (वय ४९) याची चौकशी केली. चौकशीदरम्यान संबंधित चालकाकडे विदेशी दारू बाळगण्याचा किंवा तिची वाहतूक करण्याचा कोणताही वैध परवाना नसल्याचे उघड झाले. तसेच ही दारू गोव्यातून आणून कोल्हापूरात विक्रीसाठी आणत असल्याची कबुलीही त्याने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या कारवाईत पोलिसांनी १ लाख ६९ हजार २९० रुपयांची विदेशी दारू, ७ लाख रुपयांची जीप आणि ८ हजार रुपयांचा मोबाईल फोन असा एकूण ८ लाख ७७ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अवैध दारू वाहतुकीवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. याप्रकरणी गजानन दिनकर पाटील याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास करवीर पोलीस ठाण्याचे अधिकारी करत असून, या अवैध व्यवहारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricket News : क्रीडा विश्वावर शोककळा! दिग्गज खेळाडूचे वयाच्या ३९ व्या वर्षी निधन

Terror Attack : दहशतवादी हल्ल्याने पाकिस्तान हादरला, पोलीस ठाण्यात तैनात जवानांवर गोळीबार, ९ जणांचा मृत्यू

बाजारातली नकली आणि खरी बटाटी कशी ओळखायची? खरेदी करण्यापूर्वी 5 ट्रिक्स ठेवा लक्षात

तुकाराम मुंढेंना राज्यातील पहिला मोठा झटका; गोरस भंडार प्रकरणात उच्च न्यायालयाचा FDA ला दणका

Maharashtra News Live Update: नांदूर मधमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढवला

SCROLL FOR NEXT