Kolhapur News Saam Digital
महाराष्ट्र

Kolhapur News: कोल्हापुरात कोहळा मिळवण्यासाठी पोलीस, भाविकांमध्ये धक्काबुक्की, प्रचंड गोंधळ

Kolhapur News: अंबामातेचा अखंड जयघोष आणि भक्तिमय वातावरणात आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई , तुळजाभवानी आणि त्र्यंबोली देवीच्या भेटीचा रम्य सोहळा विधिवत पार पडला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Kolhapur News

अंबामातेचा अखंड जयघोष आणि भक्तिमय वातावरणात आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई , तुळजाभवानी आणि त्र्यंबोली देवीच्या भेटीचा रम्य सोहळा विधिवत पार पडला. अश्विन शुद्ध पंचमी म्हणजे ललितापंचमी आज उदंड उत्साहात पार पडली. दरम्यान कोहळा फोडल्यानंतर कोहळ्याचा तुकडा मिळवण्यासाठी पोलीस आणि भाविकांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. त्यामुळे मंदिरात काहीकाळ गोंधळ उडाला होता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोहळ्यानंतर परंपरेने कुमारिकेच्या हस्ते कोहळारुपी राक्षसाचा वध करून कुष्मांड विधी करण्यात आला. संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते कुमारिकेचे आणि देवीचे पूजन करून कुष्मांड विधी पार पडला. नवरात्रोत्सवाची पाचवी माळ ललितापंचमीची म्हणजेच टेंबलाईवाडी येथील त्र्यंबोली देवीच्या यात्रेची असते. परंपरेनुसार शाही लवाजम्यासह तोफेची सलामी दिल्यानंतर देवीची सोन्याची पालखी मंदिराच्या मुख्य दरवाजातून टेंबलाईवाडीकडे मार्गस्थ झाली.

शारदीय नवरात्रोत्सवातील महत्त्वाचा दिवस मानल्या जाणाऱ्या अंबाबाई त्र्यंबोली भेटीचा सोहळा आज ललिता पंचमीच्या दिवशी धार्मिक वातावरणात संपन्न झाला . कोल्हासुराच्या वधाचे प्रतीक म्हणून कोहळा फोडण्याचा विधी त्र्यंबोली मंदिरात होत असल्याने या परिसराला जत्रेचं स्वरूप प्राप्त झालं होत . दुपारी बारा वाजता युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत या मंदिरातील पुजेचा मान असणाऱ्या गुरव घराण्यातील कुमारीका निधी श्रीकांत गुरव हिच्या हस्ते देवी समोर पारंपरिक पद्धतीने कोहळा फोडण्याचा सोहळा संपन्न झाला. यावेळी त्रीशुलीने कोहळा फोडल्यानंतर कोहळ्याचा तुकडा प्रसाद म्हणून घेण्यासाठी नेहमी भाविकांची गर्दी होत असते. मात्र यंदा पोलीस आणि देवस्थान समितीचे मानकरी आणि उपस्थित भक्तांमध्ये चढाओढ झाली. अक्षरश पोलिसांना धक्काबुक्की करत हा कोहळा तुकडा मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे मंदिर परिसरात एकाच गोंधळ उडाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News : लोकसभेत घटनादुरूस्ती विधेयक मांडले, विरोधकांचा गोंधळ

Highest egg consumption: कोणत्या देशात सर्वाधिक अंडी खाल्ली जातात?

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कल्याणमध्ये खिंडार, नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा शिंदेसेनेत प्रवेश

Basundi Recipe: सणासुदीला घरी बनवा गोड बासुंदी; सोपी रेसिपी वाचा

Nashik Flood : गोदावरीला पूर, अनेक वाहनं अडकली | VIDEO

SCROLL FOR NEXT