Maharashtra Cabinet Meeting Decision : ठाण्यात परवडणारी घरं... मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे ७ निर्णय वाचा

Mumbai News : आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने महत्त्वाचे ८ निर्णय घेतले आहेत.
Maharashtra Cabinet
Maharashtra CabinetSaam Tv
Published On

Maharashtra Cabinet Meeting Decision :

राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक आज पार पडली. आजच्या बैठकीत महत्त्वाचे ७ ते ८ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. वित्त विभाग, सामाजिक न्याय,सहकार व वस्त्रोद्योग,ऊर्जा विभाग,कामगार विभाग, विधी व न्याय विभाग, पशुसंवर्धन विभागातील काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यातील सूत गिरण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतलाय. या गिरण्या व्यवस्थितपणे चालवण्यात येणार असून या गिरण्यावरील कर्जाचे व्याज सरकार भरणार आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

  • महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई मधून शासकीय बँकिंग व्यवहार करता येणार ( वित्त विभाग)

  • महाप्रितमार्फत ठाण्यात समूह गृहनिर्माण प्रकल्प राबविणार. परवडणारी घरे मोठ्या प्रमाणावर उभारणार ( सामाजिक न्याय )

  • राज्यातील सूतगिरण्या सुरळीतपणे चालवणार. पुढील पाच वर्षे कर्जावरील व्याज शासन भरणार ( सहकार व वस्त्रोद्योग)

  • कोराडीत सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावरील वीज प्रकल्पास मान्यता.( ऊर्जा विभाग)

  • इमारत व बांधकाम कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ गतीने मिळणार. कामगार नियमांत सुधारणा करणार ( कामगार विभाग)

  • बार्टी, सारथी, महज्योती, अमृत या संस्थांच्या कार्यक्रमांत समानता आणण्यासाठी धोरण ( सामाजिक न्याय)

  • राज्यात चार धर्मादाय सह आयुक्त पदांची निर्मिती करणार ( विधी व न्याय विभाग )

  • अहमदनगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय( पशुसंवर्धन विभाग)

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबईतून शासकीय बँकिंग व्यवहार करता येणार

शासकीय कार्यालयांच्या बँकिंग विषयक व्यवहार आणि सार्वजनिक उपक्रम महामंडळे यांच्याकडील निधी गुंतवण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई या बँकेस पात्र ठरविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्य सहकारी बँक सहकार क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावते.

या बँकेला अधिक सक्षम करणे तसेच ग्रामीण पतपुरवठ्यात वाढ करणे आवश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आला. राज्य सहकारी बँक, मुंबई या बँकेचे मुल्य ४ हजार कोटींपेक्षा जास्त आहे. तसेच ही बँक सतत ५ वर्षे नफ्यात राहिलेली आहे. लेखा परीक्षणात देखील सतत ५ वर्षे या बँकेला अ वर्ग दर्जा आहे. भांडवल प्रर्याप्तता गुणोत्तर १२ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. या बँकेवर रिझर्व्ह बँकेचे कोणतेही आर्थिक निर्बंध किंवा त्वरित सुधारणा करावयाची कार्यवाही लादलेली नाही.

कोराडीत सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावरील वीज प्रकल्पास मान्यता

नागपूरमधील कामटी तालुक्यातील कोराडी येथे २ x६६० मेगावॅट क्षमतेच्या कोळशावर आधारित वीज प्रकल्प होणार आहे. या प्रकल्प सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावरील वीज प्रकल्पास मान्यता देण्यात आलीय. महानिर्मिती कंपनीच्या जुन्या बंद होणाऱ्या १२५० मेगावॅट क्षमतेच्या संचाच्या बदल्यात हा १३२० मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यासाठी येणाऱ्या १० हजार ६२५ कोटीच्या खर्चास देखील मान्यता देण्यात आलीय.

Maharashtra Cabinet
Praniti Shinde: भाजपने सहा ठेकेदारांना महाराष्ट्र विकला आहे...; आमदार प्रणिती शिंदेंचा घणाघात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com