IPS Birdev Siddappa Donne Saam Tv News
महाराष्ट्र

IPS Birdev Donne : पालावरचं राहणं, मेंढ्या पाळत या गावातनं त्या गावातला प्रवास; IPS बिरोबाची सच्ची कहाणी

IPS Birdev Siddappa Donne : पालावरचं राहणं.... मेंढ्या पाळत या गावतनं त्या गावातला प्रवास...इतभर पोटाची खळगी भरण्याचा संघर्ष अशा परिस्थितीत सुद्धा चेहऱ्यावर हसू ठेवून भाकरी थापणारी माऊली अन् आनंदानं भाकरीचा तुकडा मोडणारे बाबा...

Prashant Patil

कोल्हापूर : ध्येय.. ध्येयासाठी केलेला संघर्ष... आणि त्यातून मिळालेलं यश.. अशी कहाणी आहे कोल्हापूरच्या बिरदेव डोणे यांची. मेँढपाळ करत UPSC ची परीक्षा दिली आणि देशात 551 वा रँक आला आणि IPS झाला... पाहुयात बिरुदेवाच्या यशाची कहाणी...

पालावरचं राहणं.... मेंढ्या पाळत या गावतनं त्या गावातला प्रवास...इतभर पोटाची खळगी भरण्याचा संघर्ष अशा परिस्थितीत सुद्धा चेहऱ्यावर हसू ठेवून भाकरी थापणारी माऊली अन् आनंदानं भाकरीचा तुकडा मोडणारे बाबा...बघून लय समाधान वाटलं... पण त्यांच्या चेहऱ्यावरील समाधानाचं अन् आनंदाचं कारण ठरलाय त्याचा ल्योक बिरदेव....

त्यांचा ल्योक बिरदेव आता दिल्लीतला साहेब झालाय...UPSC परीक्षेत मोठं यश मिळवून IPS झालाय...मग आनंद आभाळा येवढा असणारच की... बिरदेव साहेबांची राहणी लैयच साधी... गड्यानं आजपण धोतर तीन गुंड्याचा शर्ट घातलाय अन् खांद्यावर घोंगडं घेतलंय... वाघ यशाच्या डोंगरावर उभा हाय पण पाय जमिनीवरच की.. गावकऱ्यांनी फेटा बांधून अन् हार घालून सत्कार केलाय...

बिरदेव कोल्हापूरमधल्या कागलच्या यमगे गावचा. ज्या दिवशी निकाल लागला तवा गडी बेळगावात मेंढर चरायला घेऊन गेलता... पालावर राहून अन् परिस्थितीच कसलीच तक्रार न करता.. आता वाघानं नाव कमवलंय...दहावीत 96 टक्के अन् 12 वीत 89 टक्के अन् UPSC पास हून IPS बननं म्हणजी काय खायचं काम नाय... बिरुदेवा तुमची कहाणी प्रत्येकाला प्रेरणादाई... तुमच्याकडं बघून अनेकांनी IAS आणि IPS व्हावं हीच अपेक्षा अन् तुम्हाला खूप शुभेच्छा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का; निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ

Maharashtra Live News Update: मुद्रांक शुल्क आणि त्यावरचा दंड भरल्यावरच व्यवहार पूर्णपणे रद्द होणार

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट? एक-दोन नव्हे, तीन-तीन प्लान आले समोर

रेल्वेचे खुनी कर्मचारी,आठ प्रवाशांचे हत्यारे मोकाट, माजुरड्या कर्मचा-यांवर कारवाई कधी?

SCROLL FOR NEXT