Kolhapur News Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur News: हद्दच केली! गरब्यासाठी अ‍ॅम्बुलन्सचा वापर, दोन वाहनांना धडक दिल्यानंतर पितळ उघडं

Kolhapur News: कोल्हापुरात भावी डॉक्टरांचा अजब प्रकार समोर आलाय.

Bharat Jadhav

(रणजित माजगावकर)

Medical College Girl Students:

नवरात्रोत्सवात तरुणींची गरबा खेळण्यासाठी विशेष पसंती असते. मात्र कोल्हापुरातील भावी डॉक्टरांनी गरबा खेळण्यासाठी भलताच प्रकार केल्याचं समोर आलंय. गरबा खेळण्यासाठी जायला भावी डॉक्टर मुलींनी ॲम्ब्युलन्स वापरली. ॲम्ब्युलन्सने या २ दुचाकींना धडक देखील दिली आहे. विशेष म्हणजे ही ॲम्ब्युलन्स शासकीय रुग्णालयाची असल्याचं समोर आलं आहे. (Latest News)

हा सर्व प्रकार काल रात्री दहाच्या सुमारास कोल्हापुरातील हॉकी स्टेडियम परिसरात घडला. रुग्णांसाठी असलेली ॲम्ब्युलन्स गरबा खेळण्यासाठी जायला वापरल्याने नागरिक संतप्त झाले. कोल्हापुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मुलींनी गरबा खेळण्यासाठी जायला चक्क सीपीआर रुग्णालयाची ॲम्ब्युलन्स वापरली. कार्यक्रमात लवकर पोहोचण्यासाठी ॲम्ब्युलन्स घेतली आणि सायरन वाजवत भरधाव पळवली.

ॲम्ब्युलन्सन असल्याने रस्त्यातील वाहने बाजूल होतील. यासाठी या वाहनाचा उपयोग केला. दरम्यान या ॲम्ब्युलन्सने एक चारचाकी आणि दोन दुचाकी वाहनांना ओव्हरटेक केले. त्यानंतर पुढील गाडीला धडक दिली. यावेळी काही नागरिकांनी रुग्णवाहिकेचा पाठलाग केला, त्यावेळी चालकाशेजारी दोन मुली बसल्याचे लक्षात आलं.नागरिकांनी ही ॲम्ब्युलन्स थांबवत मागचे दार उघडण्यास सांगितले. सुरुवातीला चालकाने नकार दिला. मात्र नागरिकांनी दबाव टाकल्यानंतर त्याने दरवाजा उघडला.

यावेळी रुग्णवाहिकेत गरबा खेळण्यासाठी जाणाऱ्या तरुणी दाटीवाटीने बसल्याचे दिसून आलं. ॲम्ब्युलन्समधील मुलींकडे अधिक चौकशी केली असता गरबा खेळण्यासाठी निघाल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थित नागरिकांनी याबाबत पोलीसांना माहिती दिली असता जुना राजवाडा पोलिसांचे गस्ती पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. चालकाच्या परवाना तपासून ॲम्ब्युलन्स सोडून दिली. रुग्णवाहिकेचा वापर गरबा खेळायला जाण्यासाठी केल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर या घटनेच्या चौकशीची संभाजी ब्रिगेडची मागणी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: छगन भुजबळ तातडीने मुंबईला रवाना

Health: शरीरासाठी आवश्यक पदार्थ कोणकोणते? जाणून घ्या एका क्लिकवर

Abhijeet Kelkar: 'धुरळा उडाला, सूर्य पुन्हा एकदा तळपला...' देवेंद्र फडणवीस यांच्या विजयानंतर मराठी अभिनेत्याची जबरदस्त पोस्ट, म्हणाला...

Amravati Assembly Election 2024: बच्चू कडूंना पराभवाचा धक्का, अमरावतीच्या प्रत्येक मतदारसंघाचा निकाल एका क्लिकवर

Maharashtra Election Result: पुणेकरांची पसंती कोणाला? पुण्यातील २१ आमदार पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT