Kolhapur Fire
Kolhapur Fire Saam tv
महाराष्ट्र

Kolhapur Fire: बापरे! सीएनजी भरताना कारने घेतला पेट अन्...; कोल्हापूरमधील थरारक घटना

साम टिव्ही ब्युरो

रणजीत माजगावकर

Kolhapur News: सीएनजी अथवा पेट्रोल पंपावर सर्वच गोष्टींची काळजी घ्यावी लागेत. एखाद्या वाहनाने येथे पेट घेतल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असते. अशात कोल्हापूर येथून अशीच एक मोठी बातमी समोर आली आहे. या घटनेत सीएनजी भरताना कारने पेट घेतला आहे. (Latest Fire News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कोल्हापूर सांगली रोडवरील चिपरी इथं रिलायन्स पेट्रोल पंपावर (Petrol Pump) ही घटना घडली आहे. घटना घडली तेव्हा इतर नागरिक मोठ्या प्रमाणावर भयभीत झाले होते. रिलायन्स पेट्रोल पंपावर कार साीएनजी भरण्यासाठी थांबली होती. कार अशा प्रकारे पेट घेईल असा कोणताच बिघाड आधी वाहन चालकाला जानवला नव्हता.

सीएनजी भरताना अचानक कारच्या डिक्कीमधून धूर येऊ लागला. तितक्यात कारमधील व्यक्ती खाली उतरले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाची वाहने घटनास्थळी पोहचली आणि आगीवर नियंत्रण आणण्यात यश आले. सदर घटनेत वाहनाचं मोठं नुकसान झालं असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे.

कारने अचानक पेट घेतला; आई-वडिलांसमोरच चिमुकलीचा मृत्यू

काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे कारला लागेल्या आगीत एक चिमकलीला तिचा जीव गमवावा लागला होता. कारमध्ये अचानक लागलेल्या भीषण आगीत (Car Fire) चार वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यात ही हृदयद्रावक घटना घडली होती. आग एवढी भीषण होती की संपूर्ण कार जळून खाक झाली.

कारचा दरवाजा जाम झाल्याने चिमुकली कारमध्ये अडकली. तरनवीर असं या चिमुकलीचं नाव आहे. अनेक जण यावेळी मदतीला धावून आले मात्र मुलीला वाचवता आले नाही.

दुचाकी आग लागून झाली खाक

वाशिममध्ये तांत्रिक बिघाड झालेल्या दुचाकीला आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना कारंजा शहरातील दिल्ली वेस भागात सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान घडली आहे. या दुचाकीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती समोर आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सातारा, दुष्काळ आणि शरद पवार; साताऱ्याच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांची चौफेर फटकेबाजी

SUV Cars in India: जबरदस्त लूक आणि पॉवरफुल इंजिन, 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत येतात या SUV

Porsche New Car: व्हॉईस कमांड, 6 एअरबॅग्ज आणि 270kmpl स्पीड; पोर्शची डॅशिंग कार भारतात लॉन्च

Mumbai News : जेव्हीएलआर मार्गावरील वाहतुकीत ३१ मे पर्यंत बदल, नेमकं काय आहे कारण?

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

SCROLL FOR NEXT