Kolhapur Gokul Protest Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur: कोल्हापुरात गोकुळ दूध संघाविरोधात मोर्चा, आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापटी; पाहा VIDEO

Kolhapur Gokul Protest: कोल्हापूरमध्ये दूध संस्था आक्रमक झाल्या आहेत. गोकूळ दूध संघाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात अनेक जण मोठ्या संख्यने सहभागी झाले आहेत. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापटी झाली.

Priya More

Summary -

  • कोल्हापुरात गोकुळ दूध संघाविरोधात मोर्चा काडण्यात आला

  • आंदोलकांनी जनावरांसह गोकुळच्या कार्यालयावर मोर्चा काढला

  • यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली

  • ४० टक्के रक्कम कपातीविरोधात फरक रक्कम परत देण्याची मागणी

रणजित माझगावकर, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळने डीबेंचरपोटी कापून घेतलेल्या दूध उत्पादकांच्या रकमेबाबत आज गोकुळ दूध संघाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दूध सस्थांनी आक्रमक होत हा मोर्चा काढला असून यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले आहेत. आंदोलकांनी जनावरं घेऊन दूध संघाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चादरम्यान वातावरण तापलं. आक्रमक झालेल्या आंदोलकांनी सोबत आणलेली जनावरं गोकुळच्या कार्यलयामध्ये घुसवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला पण आंदोलक ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलक आणि पोलिस यांच्यात झटापटी झाली.

दूध संस्थांनी गोकूळ दूध संघाच्या ताराबाई पार्क इथल्या कार्यालयावर मोर्चा काढला. एकूण १३६ कोटी रुपये इतकी मोठी रक्कम फरक म्हणून गोकुळने जाहीर केली होती. त्यातील तब्बल ४० टक्के इतकी रक्कम डिबेंचर पोटी कपात करण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात ऐन दिवाळीत कमी प्रमाणात फरक द्यावा लागणार आहे. म्हणूनच एकतर फरक रक्कम वाढवा किंवा कपात रक्कम सर्वांना परत द्या अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

गोकूळ दूध संघाने डिबेंचर पोटी ४० टक्के रक्कम कपात केल्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर दूध संकलक संस्था आणि दूध उत्पादकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे असे सांगत आज दूध उत्पादकांनी मोर्चाचे आयोजन केले. गायी आणि म्हैशींसह हा मोर्चा गोकुळच्या प्रधान कार्यालयावर काढण्यात आला. कोल्हापुरातल्या सर्किट हाऊस ते ताराबाई पार्क येथील गोकुळ कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला दूध संस्था प्रतिनिधी आणि उत्पादक मोठ्या संख्येने सहभागी झाले. या सर्वांनी मोर्चामध्ये जनावरांना आणले. त्यांनी गोकूळच्या कार्यलयात जनावरं घुसवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये वाद झाला. याचे व्हिडीओ समोर आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पावसाळ्यात नेसण्यासाठी साडीचे ५ लेटेस्ट ट्रेंडिंग पॅटर्न; प्रत्येक महिलेला उठून दिसतील

Beed Crime: हॉटेलबाहेर ८ ते ९ जणांकडून हल्ला, पोटात चाकू भोसकला; विलास घुले हत्याकांडाचा थरारक VIDEO समोर

Maharashtra News Live Update: जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! या ३ कारणांमुळे पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता रखडला, तुम्हीही ती चूक केलीय का?

५०० कोटींचा घोटाळा, ६० कोटी खात्यात वळवले; बड्या IAS अधिकाऱ्याला CBI कडून अटक, प्रशासकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT