Kolhapur Crime Saam tv
महाराष्ट्र

Kolhapur Crime: कुटूंब वरच्‍या रूममध्‍ये झोपलेले; खाली चोरट्यांनी केला हातसाफ, साडेदहा लाखाचा मुद्देमाल लंपास

कुटूंब वरच्‍या रूममध्‍ये झोपलेले; खाली चोरट्यांनी केला हातसाफ, साडेदहा लाखाचा मुद्देमाल लंपास

साम टिव्ही ब्युरो

रणजीत माजगावकर

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा (Kolhapur) सुळसुळाट वाढला आहे. याच दरम्‍यान शहरातील बंद बंगल्‍यात चोरट्यांनी प्रवेश करत साडेदहा लाखाचा मुद्देमाल (Theft) लांबविला आहे. (Live Marathi News)

कोल्‍हापूर शहरातील राजारामपुरीतल्या तेराव्या गल्लीतील मंडलिक पार्क इथं बंद बंगल्याला अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य केले. चक्क दुसऱ्या मजल्यावर कुटुंब झोपले असताना खालच्या मजल्यावरील हाॅलचा दरवाजा तोडून चोरट्यांनी साडेतीन लाखांच्या रोकडसह सोन्याचे दागिने असा १० लाख ५० हजारांच्या मुद्देमालावार डल्ला मारलाय.

पोलिसांकडून शोध सुरू

सदर प्रकरणी पुष्कराज सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT