Kolhapur Crime News Saam TV
महाराष्ट्र

Kolhapur News: दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग, मुलाचं आईसोबत भयानक कृत्य; मन सुन्न करणारी घटना

Kolhapur Crime News: दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून व्यसनाच्या आहारी गेलेल्या एका नराधम मुलाने जन्मदात्या आईची खुरप्याने वार करुन हत्या केली.

Satish Daud

रणजित मांजगावकर, साम टीव्ही

Kolhapur Crime News

कोल्हापूर जिल्ह्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून व्यसनाच्या आहारी गेलेल्या एका नराधम मुलाने जन्मदात्या आईची खुरप्याने वार करुन हत्या केली. ही धक्कादायक घटना जिल्ह्यातील वंदूर गावात बुधवारी (२ नोव्हेंबर) रात्रीच्या सुमारास घडली. सुनीता अशोक वाईंगडे असं मृत महिलेचं नाव आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याप्रकरणी पोलिसांनी नराधम मुलाला अटक केली आहे. निलेश वाईंगडे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. या घटनेनं परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वंदूर गावात राहणाऱ्या सुनीता वाईंगडे या मोलमजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या.

सुनीता यांचा मुलगा आरोपी निलेश याला दारुचे व्यसन होते. दारू पिण्यासाठी निलेश हा सुनीता यांच्याकडे पैशांची मागणी करत होता. यावरुन दोघांमध्ये वाद होत होते. बुधवारी रात्रीच्या सुमारास निलेश हा दारू पिऊन घरी आला. त्याने आई सुनीता यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली.

सुनीता यांनी पैसे देण्यास नकार दिला. यावरुन आरोपी निलेश याने रागाच्या भरात सुनीता यांच्यावर खुरप्याने वार (Crime News) केले. आरोपी इतक्यावर थांबला नाही, तर त्याने नायलॉनच्या दोरीने गळा आवळून जन्मदात्या आईची हत्या केली. दरम्यान, शेजारच्यांना ही घटना समजल्यानंतर त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.

माहिती मिळताच पोलीस (Police) घटनास्थळी हजर झाले. पोलिसांनी सुनीता यांचा मृतदेह ताब्यात घेत आरोपी निलेश यांना अटक केली. दारूच्या व्यसनाने आजवर अनेकांचे कुटुंब उध्वस्त झाली आहेत. त्यामुळे दारुचं व्यसन असल्यास तरुणांनी आजच सोडून द्यावं, अशी विनंती सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात बोल्ड अन् ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'कडक'

SCROLL FOR NEXT