Kolhapuar Crime Saam tv
महाराष्ट्र

Kolhapuar Crime : घराचा दरवाजा तोडून जबरी लूट; १० तोळे दागिन्यांसह रोख रक्कमेवर डल्ला

Kolhapur News : शुक्रवारी ते पत्नी सोबत कामानिमित्त सातारा येथे गेले होते. घरामध्ये त्यांचा मुलगा अशिष शिंदे एकटाच होता. नथुराम शिंदे यांना नातीची आठवण आली म्हणून आशिषला त्यांनी शनिवारी सातारा येथे बोलवून

Rajesh Sonwane

रणजित माजगावकर 

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील पाचगाव इथल्या शिक्षक कॉलनीत जबरी चोरी झाल्याची घटना उघड झाली आहे. घराच्या मुख्य दरवाजाची कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करत दोन बेडरूममधील तीन कपाटे फोडून यातील दहा तोळे सोन्या- चांदीचे दागिने, तसेच रोख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लांबविला आहे. या प्रकरणी पोलीसांकडून तपास करण्यात येत आहे. 

कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील पाचगाव शिक्षक कॉलनीत सोमवारी मध्यरात्री एकच्या दरम्यान ही चोरी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नथुराम शिंदे हे आपल्या कुटुंबास सोबत शिक्षक कॉलनीत एक वर्षापासून वास्तव्यास आले आहेत. दरम्यान शुक्रवारी ते पत्नी सोबत कामानिमित्त सातारा येथे गेले होते. घरामध्ये त्यांचा मुलगा अशिष शिंदे हा एकटाच होता. नथुराम शिंदे यांना नातीची आठवण आली म्हणून आशिषला त्यांनी शनिवारी सातारा येथे बोलवून घेतले. 

घर बंद असल्याचा उचलला फायदा 

यानंतर आशिष घराला कुलूप घालून साताऱ्याला रवाना झाले. हि संधी साधत चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास घरात प्रवेश करत दागिने व रोख रक्कम लांबविली आहे. दरम्यान सकाळी शेजाऱ्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. तात्काळ त्यांनी शिंदे यांची संपर्क साधून दरवाजा उघडा असल्याचे सांगितले. या घटनेची माहिती कळताच करवीर पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन संपूर्ण परिसर व घटनास्थळाची पाहणी केली. 

पोलिसांकडून तपास सुरु 

घरातील दोन्ही बेडरूम मधील एकूण तीन कपाटे कटावणीने फोडली आहेत. यातून दहा तोळे सोन्या-चांदीच्या दागिन्यासह रोख १३ हजार रुपयांवर चोरट्याने डल्ला मारला. पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला असून श्वास पथकाच्या सहकार्याने चोरट्यांचा माग काढण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. ठसे तज्ञ व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस फौजफाट्यासह दाखल होऊन तपास सुरू केला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT