Kolhapur Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur Crime News: हनुमान मंदिरात मोठी चोरी, ११ किलो चांदी चोरट्यांनी केली लंपास; आरतीसाठी मंदिर उघडताच समोर आली घटना

Theft In Kolhapur Hanuman Temple: पहाटे ५ वाजता पुजारी मंदिरात पूजेसाठी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे वंदूर गावामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Priya More

रणजीत माजगावकर, कोल्हापूर

Kolhapur News: कोल्हापुरमध्ये (Kolhapur News) हनुमान मंदिरामध्ये (Hanumar Temple) चोरीची मोठी घटना समोर आली आहे. कागल तालुक्यातील वंदूर इथे ही घटना घडली. चोरट्यांनी मंदिराती हनुमानाच्या मूर्तीवरील एक किलो चांदीच्या मुकुटासह १० किलो वजनाची चांदीची प्रभावळ लांबवली आहे. चोरट्यांनी तब्बल ६ लाख ६० हजार रूपयांच्या ११ किलो चांदीची चोरी केली. पहाटे ५ वाजता पुजारी मंदिरात पूजेसाठी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे वंदूर गावामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वंदूर गावच्या मध्यवस्तीत ग्रामदैवत हनुमानाचे मंदिर आहे. दररोज पहाटे पाच वाजता मंदिर पूजेकरिता उघडण्यात येते आणि रात्री आरती करून साठेआठ वाजता बंद केले जाते. विश्वनाथ रामचंद्र गुरव मंदिरात नियमित पूजा करत असतात. आज पहाटे ते मंदीरात पूजेकरीता आले होते. यावेळी मंदिराचा मुख्य दरवाजा आणि गाभार्‍याच्या दरवाजाचे कुलूप तोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तर गाभाऱ्यातील हनुमानाच्या मुर्तीचा चांदीचा मुकूट आणि चांदीची प्रभावळ चोरीला गेल्याचे त्यांना दिसून आले.

गुरव यांनी ही माहिती शिवसिंग घाटगे यांना दिली. तसेच मंदिरात चोरी झाल्याचे कागल पोलिसांना कळविण्यात आले. कागल पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक डॉ. वाघ यांनी कर्मचार्‍यांसह घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. मंदीरातील चोरीची घटना गावात वाऱ्यासारखी पसरल्याने अनेक ग्रामस्थांनी मंदिराकडे धाव घेतली.

चोरट्यांनी मंदिरातील मुर्तीवरील 1 किलो वजनाचा चांदीचा मुकूट आणि मुर्तीच्या भोवती असलेली दहा किलो वजनाची चांदी चोरून नेली. मंदीराच्या पाठीमागे असलेल्या कागल - सिध्दनेर्ली रोडवरील एका शेतात ही प्रभावळ नेऊन त्याची चांदी काढून घेतली. तर त्याची लाकडी कमान शेतात टाकून पलायन केले.

श्वान पथक मंदिरापासून प्रभावळ टाकलेल्या शेतात जाऊन घुटमळले. सदाशिव लोकरे या ग्रामस्थाने दहा वर्षांपूर्वी ही प्रभावळ मंदिराला दान केली होती. चोरट्यांनी ११ किलो वजनाची आणि ६ लाख ६० हजार रूपये किंमतीची चांदी चोरीला गेल्याचे फिर्यादीत नमूद केले. पोलीस विविध मार्गाने चोरीचा तपास करत आहेत. मात्र गावात सीसीटीव्ही नसल्याने तपासात अडथळा निर्माण होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

SCROLL FOR NEXT