Kolhapur Crime News Saam TV
महाराष्ट्र

Kolhapur Crime News: खळबळजनक! पोलिसांच्या छाप्यानंतर दोघांच्या इमारतीवरून उड्या, एकाचा मृत्यू

पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने दोघांनी इमारतीवरून उड्या मारल्या, त्यात साहिल मायकेल मिणेकर याचा जागीच मृत्यू झाला तर दत्तात्रय देवकुळे गंभीर जखमी झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

रणजीत माजगावकर

Kolhapur News: कोल्हापूर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इमारतीमध्ये जुगार खेळत असलेल्या दोन मुलांनी इमारतीवरुन उडी घेतली आहे. पोलिसांनी या इमारतीवर छापेमारी केली. त्यावेळी भीतीने दोन तरुणांंनी खाली उडी घेतली. यात एकाचा जागीच मृत्यू झालाय. (Latest Marathi News)

इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सहाजण जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तेथे छापा टाकला. पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने दोघांनी इमारतीवरून उड्या मारल्या, त्यात साहिल मायकेल मिणेकर याचा जागीच मृत्यू झाला तर दत्तात्रय देवकुळे गंभीर जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्रनगर इथल्या एका दुमजली इमारतीत सहाजण जुगार खेळत असल्याची माहिती रविवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास पोलिसांना मिळाली. पोलिस ११ वाजण्याच्या सुमारास तेथे पोहोचले. पोलीस छापेमारी करत आहेत हे समजताच साहिल आणि दत्तात्रय हे दोघेही प्रचंड खाबरले. आपल्यावर कारवाई होणार, परिसरात आपलं नाव खराब होणार, आपण आपल्या आई बाबांना काय उत्तर देणार असे प्रश्न त्या क्षणी या दोघांच्या मनात आले.

कारवाईच्या भीतीने साहिल आणि दत्तात्रय दोघांनीही इमारतीवरुन उड्या मारल्या. इमारतीवरुन (Building) उडी घेताच साहिल खाली असलेल्या दगडावर आदळला. डोक्यावर दगड लागल्याने तो पुरता रक्तबंबाळ झाला. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झालाय.

सदर घटनेनंतर पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी सीपीआरमध्ये आणण्यात आला आहे. तर दत्तात्रय याने देखील इमारतीवरुन उडी घेतल्याने त्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. साहिल हा खासगी कंपनीत नोकरी करत होता. त्याच्या पश्चात आई-वडील पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face care: मॉइश्चरायझिंग आणि ग्लोईंग स्किनसाठी, रोज रात्री करा 'या' पेस्टने करा ५ मिनिटं मसाज

Maharashtra News Live Update: शिवराज्याभिषेक सोहळ्याकरिता लाखोंच्या संख्येने शिवभक्त किल्ले रायगडच्या पायथ्याशी दाखल

Pune Crime News : दिवसाढवळ्या गोळीबार, पुण्यातील पाटस हादरलं; दोन गटांतील वादानंतर तुफान हाणामारी

हृदयद्रावक! सर्पदंशाने ३ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; कुटुंबीयांनी सापच आणला रुग्णालयात

Chanakya Niti : चाणक्यांच्या या 6 सायलेन्स स्टॅटर्जी शत्रूला करतील कमजोर

SCROLL FOR NEXT