Kolhapur Crime Saamtv
महाराष्ट्र

Kolhapur Crime News: धक्कादायक! एकमेकांकडे बघण्यावरुन वाद; आईसह दोन मुलांना बेदम मारहाण

Crime News IN Marathi: या प्रकरणी 5 ते 6 जणांच्या विरोधात राजाराम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Gangappa Pujari

रणजित माजगावकर, प्रतिनिधी...

RajaramPuri Crime: कोल्हापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापुरच्या राजारामपुरीत एकमेकांना बघण्यावरून तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार घडला.सोसायटीच्या पार्किंगमध्ये झालेल्या या भांडणात महिलेसह त्यांच्या दोन्ही मुलांना जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली असून घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Crime News In Marathi)

याबाबत अधिक माहिती अशी की, राजारामपुरीत सोसायटीच्या पार्किंगमध्ये शुल्लक कारणावरुन कुटूंबाला बेदम मारहाण करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरुन हा वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या वादात शेफाली मेहता आणि त्यांची दोन्ही मुले केनील मेहता, तनिष मेहता यांना जबर मारहाण करण्यात आली. या मारहाण प्रकरणात संजय पोवार त्यांची पत्नी विद्या पोवार आणि मुलगा अर्जुन पोवार यांच्यासह 5 ते 6 जणांच्या विरोधात राजाराम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Kolhapur News)

दरम्यान, मारहाण करणारा संजय पोवार हा छत्रपती संभाजीराजे यांचा कार्यकर्ता असल्याचाही दावा तक्रारदार महिलेने केला आहे. संजय पोवार यांच्याकडून जीवितास धोका असल्याने तत्काळ कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. या हल्ल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : या राशींच्या व्यक्तींना नागदेवता पावणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय

Kolhapur Superstition : अंधश्रद्धेचा कहर! बाहुली, नारळ, लिंबू अन् एक चिठ्ठी; कोल्हापुरात घटस्फोटासाठी अघोरी प्रकार

Ashok Sharaf: सलमान खानने अशोक सराफ यांचा गळाच कापला; ३३ वर्षानंतर मामांनी सांगितला शुटिंगचा थरारक किस्सा

Micro Walking: मायक्रो वाकिंग म्हणजे काय? यामुळे कोणते फायदे होतात

SCROLL FOR NEXT