Gunaratna Sadavarte saam tv
महाराष्ट्र

हा मुहूर्त कशातून शोधला : सदावर्ते; न्यायालयाने सुनावली ५ दिवस पाेलीस काेठडी

आज गुणरत्न सदावर्तेंना काेल्हापूरातील न्यायालयात हजर केले हाेते.

संभाजी थोरात

कोल्हापूर : मराठा आरक्षणा (maratha reservation) विराेधात लढण्यासाठी बेकायदेशिर पैसे गाेळा केल्या प्रकरणी काेल्हापूर पाेलीसांनी (kolhapur police) अटक केलेल्या वकील गुणरत्न सदावर्ते (gunaratna sadavarte) यांना आज (गुरुवार) काेल्हापूर (kolhapur) सत्र न्यायालयात (court) हजर करण्यात आले हाेते. न्यायालयाने सदावर्तेंना पाच दिवसांची पोलीस कोठडी (police custody) सुनावली आहे. (gunaratna sadavarte latest marathi update)

काेल्हापूर पाेलीसांनी बुधवारी सदावर्तेंना (Gunratna Sadavarte Latest Marathi News) गिरगाव न्यायालयाच्या (girgoan court) आदेशानंतर ताब्यात घेतले हाेते. त्यांना आज शाहपूरी पाेलीसांनी काेल्हापूरच्या सत्र न्यायालयात हजर केले.

न्यायाधिश व्ही. पी. गायकवाड यांच्या समाेर आजची सुनावणी झाली. प्रारंभी शाहूपुरी पाेलीस ठाण्याचे पी आय राजेश गवळी यांनी दाखल गुन्ह्याबाबत न्यायालयाला माहिती दिली. सरकारी वकील आम्रपाली कस्तुरे, फिर्यादीचे वकील ऍड शिवाजीराव राणे आणि सदावर्तें यांचे वकील पीटर बारदेस्कर यांनी आपआपले मुद्दे न्यायाधिशांपुढे मांडले.

सदावर्ते यांनी वारंवार मराठा समाज आणि न्यायाधीशांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केली आहेत. या मागे आणखी कोण आहे. कोणाच्या साथीने ते अशी वक्तव्य करतात याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे फिर्यादीचे वकील शिवाजीराव राणे यांनी म्हणणे मांडले.

सदावर्ते यांचे वकील पीटर बारदेस्कर म्हणाले त्यांनी वक्तव्य केल्यानंतर जातीय तेढ निर्माण झाला नाही. जे काही बोलले ते माध्यमांसमाेर आहे. त्यासाठी पाेलीस काेठडीची कशाला हवी आहे. यामध्ये रिकव्हर करायचं असेल तर पाेलीस काेठडी याेग्य ठरेल मात्र इथं तस काहीच नाही. त्यामुळे पाेलीस काेठडी देऊ नये असे म्हणणे बारदेस्करांनी मांडले.

हा मुहूर्त कशातून शोधला : सदावर्ते

सदावर्ते यांनी देखील आपली बाजू मांडताना तक्रारीमधील चुका न्यायालाच्या निदर्शनास आणून दिल्या. तसेच तक्रार इतक्या वेळाने का दिली. हा मुहूर्त कशातून शोधला अशी टिप्पणी देखील त्यांनी तक्रारीवरुन केली.

५ दिवस पाेलीस काेठडी

न्यायाधिश व्ही. पी. गायकवाड यांनी सर्व बाजू समजून घेतल्यानंतर सदावर्ते यांना पाच दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : यापुढे बोलताना काळजी घेईल, कोकाटेंचे स्पष्टीकरण

Monsoon hepatitis symptoms: पावसाळ्यात गर्भवती महिलांना हिपॅटायटीस संसर्गाचा धोका; 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Building Scam : ईडीची वसईत १२ ठिकाणी छापेमारी, माजी आयुक्तांच्या घरी टाकली धाड, नेमकं प्रकरण काय?

Walnut Benefits: दररोज ३ ते ४ अक्रोड खाल्ल्याने दूर होते आरोग्याची 'ही' त्रासदायक समस्या

Maharashtra Politics : माणिकराव, तुमच्यामुळे सरकारची बदनामी होतेय, अजित पवारांकडून राजीनाम्याचे संकेत

SCROLL FOR NEXT