Karveer Niwasini Kolhapur Chya Ambabai Chi Murti Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur Ambabai Devi: अंबाबाई देवीच्या मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण; डोळ्यांत साठवून ठेवावं असं विलोभनीय रूप, EXCLUSIVE व्हिडिओ

Kolhapur Ambabai Idol and Temple News: रविवारी आणि सोमवारी दोन दिवस संवर्धन प्रक्रिया करण्यात आलीय. ही संवर्धन प्रक्रिया पुरातत्व रसायनतज्ञ विभागाचे उपअधिक्षक डॉ. एस. विनोद कुमार, वरिष्ठ प्रतिमाकार सुधीर वाघ, प्रतिमाकार मनोज सोनवणे यांनी पूर्ण केली. आज विधीपूर्वक पूजा केल्यानंतर अंबाबाई देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांना परवानगी देण्यात आलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(रणजीत माजगावकर, कोल्हापूर)

Karveer Niwasini Kolhapur Ambabai Idol News

करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीची गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेली संवर्धन प्रक्रिया सोमवारी पूर्ण झाली. आज मंगळवारी अंबाबाईच्या मूळ मूर्तीवरील धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर सकाळी ११ नंतर दर्शन सुरू झालं. संवर्धनानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सकाळी पाहणी मूर्तीची केली होती. त्यानंतर विधी पूर्ण पूजा झाल्यानंतर दर्शन घेण्यास परवानगी देण्यात आलीय.

श्री अंबाबाई मूर्तीची मोठी झीज झाली होती. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केंद्रीय पुरातत्व विभागाकडे मूर्तीच्या संवर्धन प्रक्रियेसाठी पाठपुरावा केला. त्यानुसार शुक्रवार आणि शनिवारी औरंगाबाद पुरातत्व रसायनतज्ञ विभाग शाखेच्या अधिकाऱ्यांनी मूर्तीची पाहणी केली.

रविवारी आणि सोमवारी दोन दिवस संवर्धन प्रक्रिया करण्यात आलीय. ही संवर्धन प्रक्रिया पुरातत्व रसायनतज्ञ विभागाचे उपअधिक्षक डॉ. एस. विनोद कुमार, वरिष्ठ प्रतिमाकार सुधीर वाघ, प्रतिमाकार मनोज सोनवणे यांनी पूर्ण केली. आज मंगळवारी पहाटे अंबाबाईची मूळ मूर्ती पुजाऱ्यांकडे सुपूर्द केली गेली, त्यानंतर मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठेचे धार्मिक विधी केले गेले.

दरम्यान महालक्ष्मी देवीच्या मूर्तीवर वर्ष २०१५ मध्ये केलेली संवर्धन प्रक्रिया कुचकामी ठरली असल्याचा अहवाल मार्चच्या दुसर्‍या आठवड्यात केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या निवृत्त अधिकार्‍यांनी दिला होता. दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार विलास मांगीराज आणि आर. एस. त्र्यंबके यांनी सादर केलेल्या अहवालात अनेक गंभीर बाबींकडे लक्ष वेधण्यात आले होते.

अंबाबाईच्या मूर्तीच्या संवर्धनाच्या पाहणीसाठी न्यायालयाकडून तज्ज्ञांची समिती नेमण्यात आली होती. या समितीकडून न्यायालयात ८ पानांचा अहवाल सादर करण्यात आला होता. मूर्तीची झालेली झीज २०१५ साली झालेल्या रासायनिक संवर्धनातील अवशेषांची झीजमुळे झाल्याचं तज्ञांनी म्हटलं होतं. संवर्धन प्रक्रिया करण्यासाठी वापरले गेलेले साहित्य मूळ पाषाणाशी जुळवून घेऊ न शकल्याने त्याला तडे जाऊन हे थर निघत असल्याचं तज्ज्ञांनी आपल्या अहवालात सांगितलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बीडमध्ये मराठा समाज बांधव आणि ओबीसी समाज बांधव आमने-सामने

Jio OTT Plans: स्वस्तात धमाल! जिओचे ३ स्वस्त OTT प्लॅन, फक्त १०० रुपयांत ९० दिवस एंटरटेनमेंट

Anant Chaturdashi 2025 live updates : चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मार्गस्थ

Fighting Viral Video: कारमध्ये बसवून धू धू धुतलं, आधी मुलीनं मारलं; नंतर मित्रानेच ९० सेकंदात २६ वेळा तरुणाच्या कानशिलात लगावल्या| पाहा VIDEO

Gold Rate Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचे दर वाढले; १० तोळ्यामागे ८,७०० रुपयांनी वाढ, वाचा आजचे भाव

SCROLL FOR NEXT