Kolhapur Santosh Shinde Death Case Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur Santosh Shinde Death Case: उद्योगपती संतोष शिंदे आत्महत्या प्रकरण, माजी नगरसेविकेसह दोघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Priya More

रणजीत माजगावकर, कोल्हापूर

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातल्या (Kolhapur) गडहिंग्लज येथील अर्जुन उद्योग समूहाचे मालक संतोष शिंदे (Businessman Santosh Shinde) यांनी पत्नी आणि मुलासह आत्महत्या केली होती. या आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी (Kolhapur Police) माजी नगसेविका आणि तिचा साथीदार पोलीस अधिकाऱ्याला ताब्यात घेतले आहे.

संतोष शिंदेंनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये ज्यांच्या नावाचा उल्लेख केला होता त्यांच्यांपैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इतर फरार दोघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. संतोष शिंदे यांनी खंडणीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले होते. याप्रकरणामुळे गडहिंग्लज शहरामध्ये खळबळ उडाली होती.

उद्योजक संतोष शिंदे यांनी आत्महत्येपूर्वी लिहलेल्या सुसाइड नोटमध्ये ज्यांच्या नावाचा उल्लेख होता त्या माजी नगरसेविका आणि त्यांचा साथीदार पोलीस अधिकारी याला पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले आहे. खंडणीच्या त्रासाला कंटाळून संतोष शिंदे यांनी आपल्या पत्नी आणि मुलासह आत्महत्या केली होती.

त्यानंतर माजी नगरसेविका आणि त्यांचा साथीदार दोघेही पळून गेले होते. मात्र त्यांचा पोलिसांनी शोध घेतला असून सोलापूरमध्ये ते लपून बसले होते. पोलिसांनी या दोघांना सोलापूरातून ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे. संतोष शिंदेनी सुसाइड नोटमध्ये पुण्याच्या दोघांच्या नावाचा देखील उल्लेख केला होता. हे दोघे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

उद्योगपती संतोष शिंदे आपल्या कुटुंबासह गडहिंग्लज शहरात राहत होते. त्यांनी आपल्या पत्नी आणि मुलासह शुक्रवारी राहत्या घरी आत्महत्या केली होती. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला होता. त्या आरोपांमध्ये त्यांना जवळपास महिनाभर तुरुंगामध्ये जावे लागले होते. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ते खूपच तणावामध्ये होते. तरीसुद्धा त्यांनी पुन्हा नव्याने उभारी घेण्याचा प्रयत्न केला. पण अचानक त्यांनी टोकाचे पाऊल उचलत कुटुंबासह जीवन संपवले.

शुक्रवारी रात्री त्यांनी राहत्या घरी पत्नी मुलासह जीवन संपवले. सकाळी ते बेडरूमचा दरवाजा उघडत नसल्याने त्यांच्या आईने शेजाऱ्यांना बोलवले आणि दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. तर बेडरूममध्ये संतोष शिंदे, त्यांच्या पत्नी आणि मुलगा असे तिघांचे मृतदेह आढळले. त्यांच्या मानेवर जखमा आढळल्या होत्या. प्राथमिक अंदाजानुसार सुरुवातीला विष पिऊन आणि त्यानंतर गळ्यावर सुरी फिरवून त्‍यांनी जीवन संपवल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला होता. या घटनेमुळे गडहिंग्लज शहरामध्ये एकच खळबळ उडाली होती. गडहिंग्लज पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT