Kolhapur bus Accident Saam Tv News
महाराष्ट्र

Kolhapur bus accident: गोव्यावरून परत येताना मध्यरात्री काळाचा घाला, खासगी बसचा भीषण अपघात, १ ठार तर ३० प्रवासी गंभीर जखमी

Goa to Chhatrapati Sambhajinagar bus crash: कोल्हापूर जिल्ह्यातील हळदी - कांडगाव मार्गावर खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू तर, तीस जण गंभीर जखमी आहेत.

Bhagyashree Kamble

कोल्हापूर जिल्ह्यातील हळदी - कांडगाव मार्गावर खासगी बसचा भीषण अपघात घडला आहे. मध्यरात्री खासगी बस उलटल्याने मोठ्या प्रमाणात प्रवासी जखमी झाले आहेत. ही खासगी बस गोव्यावरून छत्रपती संभाजीनगर येथे जात होती. हळदी - कांडगाव मार्गावर तीव्र वळण घेत असताना खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. या बस अपघातात एकाचा मृत्यू तर, तीस प्रवासी जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.

गोव्यावरून छत्रपती संभाजीनगरला जाणाऱ्या खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. ही खासगी बस गोव्यावरून छत्रपती संभाजीनगरला जात होती. मात्र, कोल्हापुरातून जात असताना हळदी - कांडगाव मार्गावर तीव्र वळणावरून जात असताना बसचा भीषण अपघात घडला आहे. या भीषण बस अपघातात एकाचा मृत्यू तर, ३० जण गंभीर असल्याची माहिती आहे.

भीषण बस अपघातात जखमी झालेले प्रवासी आणि मृत व्यक्ती छत्रपती संभाजीनगरमधील असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर सध्या कोल्हापूरमधील सीपीआर रूग्णालयात उपचार सुरू आहे. हे प्रवासी छत्रपती संभाजीनगरच्या कंपनीतील कर्मचारी आहेत आणि हे सर्व प्रवासी गोव्याला सहलीसाठी गेले होते.

ही खासगी बस सायंकाळी ७ वाजता कणकवलीवरून सुटली. नंतर फोंडा घाटातून कोल्हापूर मार्गे ही बस निघाली होती. मात्र, कोल्हापुरात पोहोचल्यानंतर हळदी कांडगाव मार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास बस उलटल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात नेमका घडला कसा याचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nag panchami 2025: यंदा नाग पंचमी कधी आहे? जाणून घ्या

Milk And Curd: दूध आणि दही एकत्र खाल्ले तर काय होते?

Pune Rave Party: खराडीतील रेव्ह पार्टीपूर्वी आरोपींची आणखी २ ठिकाणी पार्टी, तपासातून धक्कादायक माहिती उघड

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

पावसात लहानग्यांचे आरोग्य जपण्यासाठी घ्या 'ही' खबरदारी

SCROLL FOR NEXT