Kolhapur Accident Video 
महाराष्ट्र

Kolhapur Accident Video: अब्जाधीश उद्योगपतीच्या एकुलता एक मुलाचा अपघाती मृत्यू; अपघाताचा शेवटचा व्हिडिओ आला समोर

Kolhapur Bike Accident Video: आजरा-आंबोली मार्गावर दुचाकी आणि चारचाकी वाहनांची समोरासमोर धडक झाली. यात सिद्धेशचा मृत्यू झाला. या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झालाय.

Bharat Jadhav

आजरा-आंबोली मार्गावर दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा अपघात झाला होता. यात दुर्घटनेत कोल्हापुरातील उद्योगपतीच्या मुलाचा मृत्यू झाला. सिद्धेश विलास रेडेकर असं दुचाकीस्वाराचं नाव आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांची समोरासमोर धडक झाली होती यात सिद्धेशचा मृत्यू झाला. सिद्धेशच्या अपघाताचा व्हिडिओ समोर आलाय.

सिद्धेश रेडेकर याला मोटारसायकल रायडिंगची आवड होती. रविवारी सकाळी सहकारी मित्र फरहाद खान, नितांत कोराणे, अभय रेडीज यांच्यासमवेत रायडिंग करत आंबोली येथे गेले. आंबोली घाट येथून परतत असताना देवर्डे ते माद्याळ दरम्यान कोल्हापूरहून सावंतवाडीकडे जाणाऱ्या चारचाकी वाहन आणि दुचाकीची धडक झाली. या अपघातात सिद्धेशचा मृत्यू झाला.

या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झालाय असून या व्हिडिओमध्ये सिद्धेशची बाईक भरधाव वेगात असल्याचं दिसत आहे. भरधाव असताना सिद्धेश चारचाकी वाहनाला समोरून ओव्हरटेक करत होता त्यात हा भीषण अपघात झाला. अत्याधुनिक हेल्मेट असतानाही जोरदार धडकेमुळे सिद्धेशचा अपघातात मृत्यू झाला. सिद्धेशचा याच अपघाताचा एक व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागलाय.

वाहनांची समोरासमोर धडक

व्हायरल झालेला व्हिडिओ हा हेल्मेटवरील कॅमेऱ्यातील आहे. हेल्मेटच्या कॅमेऱ्याने अपघाताची अखेरचे दृश्य कैद झाली आहेत. या व्हिडिओमध्ये सिद्धेशच्या बाईकचा वेग अधिक आहे. भरधाव वेगात सिद्धेश बाईक चालवत असून त्याच वेगात तो समोरून येणाऱ्या कारला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतोय. पण वाहनांमधील अंतराचा अंदाज न आल्याने दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली.

 डोक्यावरती 70 हजाराचं अत्याधुनिक हेल्मेट तरीही, मृत्यू

सिद्धेश रेडेकर कोल्हापूरमध्ये आर्किटेक्चरचे शिक्षण घेत होता. सिद्धार्थ बाईकर्स होता. सिद्धार्थकडे १२ लाख रुपयांची बाईक होती, तर सुरक्षा म्हणून तो ७० हजार रुपयांचं हेल्मेट वापरत असायचा. परंतु हजारो रुपयांचे हेल्मेटही त्याचा जीव वाचवू शकले नाही. सिद्धार्थ बायकर्स असल्याने नेहमीच फेरफटका करण्याची सवय होती. नेहमीप्रमाणे सिद्धार्थ रेडेकर हा चार मित्रांसमवेत रविवारी सकाळी आंबोलीकडे बाईक राईडसाठी गेला होता. त्यावेळी त्याचा अपघात झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT