Accident, Wardha, Pulgoan Highway Saam tv
महाराष्ट्र

Kolhapur News| कोल्हापूर - बालिंगा रस्त्यावर भीषण अपघात; २ जण जागीच ठार

कोल्हापूर बालिंगा रस्त्यावर ट्रक आणि मोटारसायकलच्या भीषण अपघात.

संभाजी थोरात

कोल्हापूर : कोल्हापूर बालिंगा रस्त्यावर ट्रक आणि मोटारसायकलच्या भीषण अपघातात (Accident) चिंचवडे तर्फ कळे (ता. करवीर) येथील विकास संभाजी तोरस्कर (२०) आणि ऋषीकेश राजाराम कांबळे (२१) हे दोन तरुण ठार झाले. कोल्हापूर-गगनबावडा रोडवरील बालिंग्यापासून काही अंतरावरील पाटील पेट्रोल पंपासमोर शुक्रवारी रात्री हा अपघात झाला. या अपघाताने कळे पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.

मिळालेली माहिती अशी, विकास आणि ऋषीकेश हे दोघे जिवलग मित्र होते. ते देखावे पाहण्यासाठी शुक्रवारी रात्री दुचाकीवरून कोल्हापूरकडे येत होते. पाटील पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर दोन दुचाकी एकमेकांना घासल्याने (Accident) त्यांचा वाहनावरील ताबा सुटला. दोघेही पुण्याहून गोव्याकडे जाणार्‍या मालवाहू ट्रकवर जोरात आदळले. त्यात एकजण ट्रकच्या मागील चाकात चिरडला गेला, तर दुसरा ट्रकला धडकून जोरात फेकला गेला.

यामध्ये ऋषीकेश जागीच ठार झाला; तर विकासचा शासकीय रुग्णालयात उपचारापूर्वीच मृत्यू झाला.अपघातात दुचाकीचा चक्‍काचूर झाला आहे. कोल्हापूर महापालिकेच्या अग्‍निशमन दलातील जवानांनी अग्‍निशमन दलाच्या वाहनातून दोघांना तातडीने रुग्णालयात (Hospital) हलविले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

SCROLL FOR NEXT