Kolhapur ACB DYSP Vaishnavi Patil car accident today  Saam
महाराष्ट्र

Accident : कोल्हापूर अँटीकरप्शन DYSP च्या कारचा भीषण अपघात, २ जणांचा मृत्यू, ३ जखमी

Kolhapur ACB DYSP Vaishnavi Patil car accident today : कोल्हापूर अँटी करप्शन ब्युरोच्या DYSP वैष्णवी पाटील यांच्या कारचा चित्रदुर्गजवळ भीषण अपघात झाला. इनोव्हा गाडी लॉरीला धडकल्याने दोन जणांचा मृत्यू झाला असून DYSP वैष्णवी पाटील यांच्यासह तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

Namdeo Kumbhar

Kolhapur ACB DYSP Vaishnavi Patil car accident today : कोल्हापूर अँटीकरप्शन DYSP वैष्णवी पाटील यांच्या कारचा आज सकाळी भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३ जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. बंगळुरूहून कोल्हापूरला येत असताना DYSP वैष्णवी पाटील यांच्या कारचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. वैष्णवी पाटील यांच्यासोबत असणाऱ्या दोन जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे.

स्थानिक मिडिया रिपोर्ट्सनुसार, DYSP वैष्णवी पाटील या बंगळुरूला गेल्या होत्या. आपले काम झाल्यानंतर घराकडे परत येत असताना कर्नाटकमधील चित्रदुर्गजवळ त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. अपघातात वैष्णवी पाटील यांच्यासोबत असणाऱ्या दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. DYSP वैष्णवी पाटील यांच्यासह तीन जण या अपघतात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

बंगळुरूहून वैष्णवी पाटील कोल्हापूरकडे निघाल्या होत्या. पहाटे चित्रदुर्गजवळ त्यांच्या कारचा भयंकर अपघात झाला. इनोव्हा गाडी लॉरीला जाऊन जोरात धडकली. अपघातात दोघा जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर महामार्गावर वाहतूककोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. जखमींना तातडीने रूग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आले. मृतदेह ताब्यात घेतले असून पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. जखमी DYSP वैष्णवी पाटील यांच्यावर चित्रदुर्ग मधील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT