Kolhapur newly couple dies due to gas leakage Saam Tv News
महाराष्ट्र

Kolhapur News : महिन्याभरापूर्वी लग्नबंधनात अडकले, नियतीला औरच मान्य; कोल्हापुरातील नवदाम्पत्यासोबत धक्कादायक घटना

Kolhapur Tragedy: एक धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा इथे घडली आहे. महिनाभरापूर्वी विवाह झालेल्या नवदाम्पत्याचा गॅस गिझरच्या लिकेजमुळे गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

Prashant Patil

कोल्हापूर : राज्यात दिवसेंदिवस धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा इथे घडली आहे. महिनाभरापूर्वी विवाह झालेल्या नवदाम्पत्याचा गॅस गिझरच्या लिकेजमुळे गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सागर सुरेश करमळकर (वय ३२) आणि सुषमा सागर करमळकर (वय २६) असं नवदाम्पत्याची नावं आहेत. महिनाभरापूर्वी विवाह झालेले करमळकर दाम्पत्य हे फिरण्यासाठी आंबोली येथे रविवारी दुपारच्या दरम्यान गेले होते.

आंबोलीहून परतल्यानंतर त्यांच्या भावेश्वरी कॉलनी येथील घरामध्ये असताना त्यांचा फोन उचलला जात नव्हता. कालांतराने फोन स्विच ऑफ झाल्याने मित्र परिवाराने सोमवारी सकाळी त्यांच्या घरी भेट देऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता गॅस गिझरचा गॅसलिकेज होऊन बाथरूममध्येच त्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याचं निदर्शनास आलं. घरामध्ये सर्वत्र गॅसचा वास होता. त्यामुळे गॅस लिकेजनेच सदर मृत्यू झाल्याची चर्चा परिसरात होती. मोठा मित्रपरिवार असणाऱ्या सागरच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई आणि भाऊ असा परिवार आहे.

२ वर्षांच्या मुलासह बायकोला विष दिलं, मग स्वत:

दरम्यान, धाराशिवमध्ये देखील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नवऱ्याने बायको आणि २ वर्षांच्या मुलाची हत्या करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. धाराशिवात बावीमध्ये ही घटना घडली आहे. धाराशिवमधील या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिवमधील बावी येथे पत्नीसह दोन वर्षांच्या मुलाची हत्या करून ३० वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ऑनलाइन जुगारात सर्व गमावलं. त्यानंतर कर्जाबाजारीपणातून तरुणाने टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. तरुणाच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. लक्ष्मण मारुती जाधव असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kiku Sharda: सुनील ग्रोव्हरनंतर कपिल शर्माचं किकू शारदासोबत बिनसलं? १३ वर्षांनंतर कॉमेडियनने सोडणार 'द कपिल शर्मा शो'; म्हणाला...

Cyber Crime : पहलगाम हल्ल्यात बँकेतून व्यवहार, डिजिटल वॉरंट दाखवत धमकी; वृद्धाला १९ लाखाचा गंडा

PM Ujjawala Yojana: महिलांसाठी आनंदाची बातमी! उज्जवला योजनेत मोफत गॅस सिलिंडरसोबत मिळणार ₹१८३०

Hingoli Crime News: रात्रीच्या वेळी झोपेतून उठवून ऑफिसमध्ये नेलं अन्...; आश्रम शाळेत 11 वर्षाच्या चिमुरडीसोबत अश्लील कृत्य

पुतण्यासोबत संबंध, नंतर जत्रेला नेत नवऱ्याचा काटा काढला, ८ वर्षांच्या मुलाकडून आईचा खरा चेहरा समोर

SCROLL FOR NEXT