Kolhapur black magic Saam Tv
महाराष्ट्र

स्मशानात जातो, करणी करतो, चुटकी वाजवतो अन् भूतबाधा काढतो; कोल्हापुरात भोंदूगिरीचा कहर; धक्कादायक VIDEO व्हायरल

Kolhapur black magic: कोल्हापुरमध्ये भोंदूगिरीचा कहर सुरू आहे. भोंदूबाबा आणि मांत्रिकांकडून करणी, जादूटोणा केला जात आहे. याचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

Priya More

Summary -

  • कोल्हापुरात स्मशानभूमीत करणी करणाऱ्या भोंदूबाबाचा व्हिडीओ व्हायरल झाला

  • भोंदूगिरी आणि अंधश्रद्धेचे प्रकार वाढत असून नागरिकांमध्ये संताप

  • पोलिस प्रशासनाकडून अद्याप ठोस कारवाई नाही

  • कोल्हापुरमध्ये भोंदूबाबांचा सुळसुळाट

  • महिला, लहान मुलांवर केली जातेय करणी

रणजित माजगावकर, कोल्हापूर

कोल्हापुरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोल्हापुर शहरामध्ये भोंदूगिरीचा कहर सुरू आहे. करणी करणं, स्मशानात जाऊन अघोरी पूजा करणं, भूतबाधा काढण्यासाठी वाटेल ते करायला लावणं असे अनेक धक्कादायक प्रकार कोल्हापुरमध्ये घडत आहेत. या भोंदूगिरीचा संतापजनक आणि अंगावर काटा आणणारा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. पुरोगामी कोल्हापुरमध्ये होत असलेल्या या भोंदूगिरीची सर्वत्र चर्चा होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भोंदूबाबा, मांत्रिकांची कोल्हापूर जिल्हासह शहरावरही वचक असल्याचे चित्र समोर आले आहे. स्मशानभूमीत चुटकी वाजून अघोरी पूजा करणे, भूत काढणे, करणी करणे यासह अनेक आघोरी प्रकार कोल्हापुरात होत असल्याचे उघड झाले आहे. लहान मुले, स्त्रिया आणि नागरिकांवर जादूटोणासह करणी केली जात आहे. मांत्रिकाद्वारे अघोरी पूजा करत स्मशानात जाऊन भूत काढणे, करणी करण्याचे प्रकार उघड झाले आहे.

पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी भोंदूगिरी आणि करणीचे प्रकार सुरू आहेत. अनेक लोकंमांत्रिक आणि भोंदूबाबांच्या जाळ्यात अडकले आहेत. कोल्हापूरमध्ये चुटकी वाजवून भूतबाधा काढणाऱ्या भोंदूबाबाचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तांत्रिक मांत्रिक आणि भोंदूबाबा जोमात असताना कोल्हापूर पोलिस प्रशासन मात्र कोमात असल्याची चर्चा आता सर्वत्र होऊ लागली आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या फोटोंमध्ये खिळे मारून लिंबू कापून करणी करण्याचे प्रकारात वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. आता कोल्हापूर पोलिस या भोंदूबाबांविरोधात नेमकी काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचे ठरेल. या भोंदूबाबांमुळे कोल्हापुरात सध्या भीतीचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pawna Lake Tourism: बजेट कमी आहे? 'या' ठिकाणी करा ट्रीप, कुल्लू मनाली विसराल

Girija Oak Photos: अभिनेत्री गिरीजा ओकचं नशीब चमकलं, एका रात्रीत बनली 'नॅशनल क्रश'

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचा जोरदार धक्का; हजारो कार्यकर्त्यांसह जालन्यातील बडा नेता शिवसेनेत जाणार

परपुरूषाशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बळजबरी; बायकोचा आयएएस नवऱ्यावर गंभीर आरोप, प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये खळबळ

Maharashtra Live News Update: अजितदादांनी राजीनाम द्ययला हरकत नाही-बच्चू कडू

SCROLL FOR NEXT