Ajit Pawar Latest News saam tv
महाराष्ट्र

Kolhapur News: मराठा समाजाच्या बैठकीत गोंधळ! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर कार्यकर्त्यांचा राडा; नेमकं काय घडलं?

Maratha Reservation Meeting Kolhapur: कोल्हापुरातील मराठा समाजाच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत बैठकीचं नियोजन केले होते.

Gangappa Pujari

रणजित माजगावकर, प्रतिनिधी...

Kolhapur News: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या कोल्हापूर दौऱ्यात आहेत. कोल्हापूरमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत मराठा समाजाची बैठक पार पडली. या बैठकीत मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक सुरू होती. योगेश केदार आणि त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी हा गोंधळ केला. ओबीसीमधून आरक्षणाची मागणी करत त्यांनी हा गोंधळ झाला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी कोल्हापुरातील मराठा समाजाचे नेते यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत बैठकीचं नियोजन केलं होते. या बैठकीला कोल्हापूरसह इतर जिल्ह्यातील मराठा समाजातील नेत्यांनाही आमंत्रित करण्यात आलं होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील एका छोट्या हॉलमध्ये निवडक नेत्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक सुरू झाली.

ज्या हॉलमध्ये ही बैठक होती, तो हॉल अतिशय लहान असल्यामुळे इतर जिल्ह्यातले नेते, कार्यकर्ते हॉल बाहेरच राहिले. बैठक सुरू होऊन देखील जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने या नेत्यांना बैठकीला आत न सोडल्यामुळे वाद निर्माण झाला.

कार्यकर्त्यांनी आरडा ओरड केल्यानंतर काही नेत्यांना बैठकीला प्रवेश देण्यात आला. मात्र तोपर्यंत बैठक संपत आली होते. बैठक संपत आल्याचे कळताच फलटण, सातारा, बीड, अहमदनगर इथून आलेल्या मराठा समाजातील नेत्यांनी अजित पवार यांच्या समोरच या बैठकीत आम्हाला विश्वासात घेतलं नसल्याचे सांगत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, आजच्या बैठकीत मराठा समाजाला ओबीसीतून कशा पद्धतीने कायदेशीर रित्या आरक्षण घेता येईल, या महत्त्वाच्या बाबी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोल्हापुरातील शिष्टमंडळाने समजावून सांगितल्या. जरी इतर नेत्यांनी या बैठकीत येऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला असला, तरीही ही बैठक यशस्वी झाल्याचा दावा कोल्हापुरातील मराठा समाजाचे नेते बाबा इंदुलकर यांनी केलेला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bachchu Kadu : समाज कल्याणचा निधी लाडक्या बहिणीकडे वळवला; बच्चू कडू यांचे सरकारवर टीकास्त्र

Diwali Rangoli : यंदा दिवाळीला काढा फुलांची रांगोळी, घर दिसेल सुंदर अन् लोक करतील भरपूर कौतुक

Maharashtra Live News Update: बिद्री साखर कारखाना कर्मचाऱ्यांना दहा टक्के पगारवाढ लागू,

निलेश घायवळ प्रकरणात २ बड्या राजकीय नेत्यांची नावं, रोहित पवारांच्या आरोपांनी खळबळ | VIDEO

Politics : निवडणुकीपूर्वी भाजपला धक्का? २ मित्रपक्ष साथ सोडण्याच्या तयारीत, चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT