ratnagiri, chiplun, crocodile, kokan rain saam tv
महाराष्ट्र

Kokan Rain Updates : पूरानंतर चिपळूणात मगरींचे संकट, रत्नागिरी जिल्ह्यात शाळांना आज सुट्टी, जिल्हाधिका-यांचा आदेशाचा भंग साता-यातील 'त्या' शाळांवर गुन्हा दाखल हाेणार

नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

अमोल कलये

Ratnagiri News : भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार २४ जुलैपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच (Orange Alert) देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळांना आज (२१ जुलै) प्रशासनाने सुट्टी जाहीर केली आहे. (Maharashtra News)

गेले चार दिवस रत्नागिरी आणि चिपळूण येथे पावसामुळे नागरिकांचे माेठे हाल झाले. सध्या चिपळूणच्या वाशिष्ठी नदीची पातळी २.६० मी म्हणजेच इशारा पातळीच्या खाली आहे. शहरात सध्या कोणत्याही ठिकाणी पाणी नाही. सध्या चिपळूण परिसरात पाऊस नसला तरी अधून मधून पावसाच्या सरी येताहेत.

कुंभार्ली घाटातील वाहतूक सुरळीत सुरू आहे. कोकण रेल्वेबाबत देखील कोणतीही समस्या नाही. रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू आहे. परशुराम घाटात दुहेरी वाहतूक सुरळीत सुरू आहे. परशुराम घाटात लाईटची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे. मौजे धनगरवाडी (पोफळी, ता. चिपळूण) येथील प्रकाश सोन्याबुवा झोरे यांच्या काल रात्री ४ म्हशी व १ रेडा पुराच्या पाण्यात वाहून गेलेला होता. ही ५ ही जनावरे आज (शुक्रवार) सकाळी जिवंत मिळालेली आहेत.

दरम्यान चिपळूणच्या वाशिष्ठी आणि शिव नदिला दोन दिवसांपुर्वी पूर आला हाेता. चिपळूणच्या पुरानंतर आता मगरींचा धोका वाढला आहे. पुरातून वाहून आलेल्या मगरी आता नागरी वस्तीत दिसू लागल्या आहेत. मानवी वस्तीत आलेल्या मगरींना पकडण्यात आले आहे मात्र नागरिकांती भीती कायम आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळांना प्रशासानाने आज (२१ जुलै) सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान सातारा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुरुवारी (ता. 20) काही शाळांनी दैनंदिन शैक्षणिक कामकाज सुरु ठेवल्याने संबंधित शाळांचा चाैकशी अहवाल शिक्षणाधिका-यांकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी (satara collector jitendra dudi) यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Health: व्यायाम करताना 'या' चुका टाळा, अन्यथा हृदयावर होतील होतील गंभीर परिणाम

Ladki Bahin Yojana: 'लाडकी'चा 4800 कोटींचा घोटाळा, कष्टकऱ्यांचे पैसे कुणाच्या खिश्यात?

Shocking : बॉयफ्रेंडशी भांडण, नैराश्यातून तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न, गळफास घेण्याआधी इंस्टाग्रामवर शेअर केली शेवटची पोस्ट

Dada Bhuse: मालेगावात शिक्षक भरती घोटाळा,शासनाला 2 कोटी 69 लाखांचा गंडा

Shailesh Jejurikar : मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G ला 'भारतीय' नेतृत्व; मराठमोळे शैलेश जेजुरीकर कोण आहेत? VIDEO

SCROLL FOR NEXT