kokan railway, ganesh utsav , ganeshotsav 2022 saam tv
महाराष्ट्र

Ganesh Utsav 2022 : गणपती बाप्पा माेरया..., काेकण रेल्वेचा उडाला बाे-या (पाहा व्हिडिओ)

गणेशाेत्सवाच्या पार्श्वभुमीवर चाकरमनी काेकणात दाखल हाेऊ लागले आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- विनायक वंजारे

Kokan Ganesh Utsav : गणेशोत्सव आणि चाकरमानी यांचे अतूट नातं आहे. यामुळेचे मोठ्या प्रमाणात चाकरमानी तळकोकणात दाखल होत आहेत. दरम्यान रेल्वेनं काेकणातील प्रवाशांसाठी जादा गाड्या साेडल्या आहेत. त्याचा लाभ काेकणवासियांनी घेतल्याचे दिसून येत आहे. परंतु जादा गाड्या साेडल्यानं काेकण रेल्वेचं (kokan railway) वेळापत्रक काेलमडल्याचे चित्र आहे.

तळकोकणात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोचला आहे. गणेश उत्सव हा कोकणातील सर्वात मोठा सण मानला जातो. गणेशोत्सव आणि चाकरमानी यांचे अतूट नातं आहे. याचमुळे मोठ्या प्रमाणात चाकरमानी तळकोकणात दाखल होत आहेत. मुंबई, पुणे येथून मिळेल त्या वाहनानं चाकरमानी गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत कुडाळ रेल्वे स्थानकात दाखल हाेत आहेत.

दरम्यान कोकण रेल्वेचे वेळापत्रक सध्या कोलमडलेल पाहायला मिळतेय. रेल्वे गाडया दोन ते तीन तास उशिराने धावत आहेत. त्यामुळे चाकरमान्यांना गावाकडे पोहोचण्यासाठी तब्बल 12 ते 14 तासांहून अधिकचा वेळ लागतोय. रेल्वे स्थानकावर पाेहचताच गणपतीचा जयघाेष करीत प्रवासी आपआपल्या गावी उत्साहानं जाताहेत.

कोकण रेल्वे मार्गावरील जवळपास सर्वच गाड्या उशिराने धावत आहेत. कोकण रेल्वे मार्गावरुन धावणाऱ्या कोकणकन्या, तुतारी एक्स्प्रेस, ओखा एक्स्प्रेस, फेस्टिवल स्पेशल, गणपती स्पेशल, जनशताब्दी, संपर्क क्रांती एक्स्प्रेस, मडगाव गणपती स्पेशल या गाड्यांनी असंख्य प्रवासी कोकणात दाखल होत आहेत मात्र जादा गाड्यांमुळे कोकण रेल्वेवरील वाहतूक उशिराने सुरु आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care : चेहऱ्यावर सतत पिंपल्स येतात? मग, क्लिन त्वचेसाठी घरच्या घरी बनवा अँटी एक्ने टोनर

Original Cotton Saree: ओरिजनल कॉटन साडी कशी ओळखायची? या आहेत लेटेस्ट 5 साडी डिझाईन्स

Maharashtra Live News Update: पुण्यातील नामांकित क्लिनिकमधून मृत महिलेची बॉडी गायब

Kalyan Crime News: शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर भररस्त्यात हल्ला; कल्याणमधील धक्कादायक घटना|Video Viral

कैसा हराया? आता संपूर्ण शहर हिरवं करू; निवडणूक जिंकताच MIMच्या महिला नगरसेवकाचं ओपन चॅलेंज, VIDEO

SCROLL FOR NEXT