Murlidhar Mohol And Raksha Khadse Saam Tv
महाराष्ट्र

PM Modi Cabinet Formation: रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोळ यांची खाती ठरली! नेमकी नवी जबाबदारी आता काय? वाचा सविस्तर

Modi Cabinet Ministers List 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळासाठी मंत्रिपदांची विभागणी केली आहे. मोदींच्या नवीन मंत्रिमंडळात मुरलीधर मोहोळ आणि रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांचीही वर्णी लागली आहे. त्यांना कोणते खाते मिळाले, हे जाणून घेऊ...

Satish Kengar

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळासाठी मंत्रिपदांची विभागणी केली आहे. यामध्ये अनेक ज्येष्ठ मंत्र्यांना मागच्या वेळेप्रमाणेच स्थान देण्यात आले आहे. तर यामध्ये अनेक नवीन चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली आहे. मोदींच्या नवीन मंत्रिमंडळात मुरलीधर मोहोळ आणि रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांचीही वर्णी लागली आहे.

मोदींच्या नवीन मंत्रिमंडळात पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आलेले मुरलीधर मोहोळ यांना सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. तर 2014 पासून साग तीन वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या रक्षा खडसे यांना क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आलं आहे.

राज्याच्या वाटेला 6 मंत्रीपदे

खडसे आणि मोहोळ यांच्या व्यतिरिक्त मोदींच्या नवीन मंत्रिमंडळात नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. त्यांना पुन्हा एकदा परिवहन आणि रस्ते कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं आहे. तर राज्यसभा खासदार रामदास आठवले यांनाही पुन्हा एकदा सामाजिक न्याय राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. याशिवाय पियूष गोयल यांना वाणिज्य आणि उद्योग कॅबिनेट मंत्रिपद आणि शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांना आयुष आणि आरोग्य राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे.

मोदींच्या मंत्रिमंडळात कोणाला कोणतं मिळालं खातं?

  • राजनाथ सिंह - संरक्षण मंत्रालय

  • अमित शहा - गृह मंत्रालय

  • नितीन गडकरी- रस्ते वाहतूक मंत्रालय

  • जेपी नड्डा- आरोग्य मंत्रालय

  • शिवराज सिंह चौहान- कृषी आणि ग्रामीण विकास मंत्रालय

  • निर्मला सीतारामन- अर्थ मंत्रालय

  • एस जयशंकर- परराष्ट्र मंत्रालय

  • मनोहर लाल खट्टर - ऊर्जा आणि शहरी विकास मंत्रालय

  • एचडी कुमारस्वामी - उद्योग आणि पोलाद मंत्रालय

  • पीयूष गोयल - वाणिज्य मंत्रालय

  • धर्मेंद्र प्रधान - शिक्षण मंत्रालय

  • जीतन राम मांझी - लघु उद्योग मंत्रालय

  • राममोहन नायडू - नागरी विमान वाहतूक मंत्रालय

  • अश्विनी वैष्णव - रेल्वे मंत्रालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालय

  • गिरीराज सिंह - वस्त्रोद्योग मंत्रालय

  • ज्योतिरादित्य सिंधिया - दूरसंचार मंत्री आणि पूर्वोत्तर विकास मंत्रालय

  • भूपेंद्र यादव - पर्यावरण मंत्रालय

  • गजेंद्र सिंह शेखावत - पर्यटन आणि संस्कृती मंत्रालय

  • अन्नपूर्णा देवी - महिला आणि बाल विकास मंत्रालय

  • किरेन रिजिजू- संसदीय कामकाज मंत्रालय

  • मनसुख मांडविया - कामगार मंत्रालय

  • हरदीप सिंग पुरी - पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू

  • चिराग पासवान - युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, अन्न प्रक्रिया मंत्रालय

  • सीआर पाटील - जलशक्ती मंत्रालय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bullet Train: बुलेट ट्रेन लवकरच धावणार; मुंबई-अहमदबाद प्रवासाचे २ तास वाचणार, जाणून घ्या ट्रेनचा ताशी स्पीड अन् थांबे?

Maharashtra Live News Update : मनोज जरांगे पाटलांचा अपघात झालेल्या लिफ्टचा परवाना नाही, विद्युत निरीक्षक कार्यालयाची माहिती

Maharashtra Politics : अजित पवारांच्या नेत्याकडून शरद पवार गटातील नेत्याला जीवे मारण्याची धमकी

Sanjay Raut: मराठी भाषा संदर्भात आम्ही हिंसाचार करणार काय उखाडायचे आहे उखाडा - संजय राऊत |VIDEO

Raksha Bandhan Special : बहिणींनो भावांसाठी प्लान करा सरप्राइज ट्रिप, कर्जतजवळ आहे भन्नाट पिकनिक स्पॉट

SCROLL FOR NEXT