Who Is Raksha Khadse: आधी सरपंच, मग जिल्हा परिषद सदस्य आणि आता खासदार ते थेट केंद्रीय मंत्री; कोण आहेत रक्षा खडसे?

NDA Govermet Cabinet Minister Raksha Khadse: नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यासोबतच ते आज त्यांच्या नवीन मंत्रिमंडळाचीही निवड करत आहेत. यामध्ये रावेर मतदारसंघातून निवडून आलेल्या रक्षा खडसे यांनाही संधी देण्यात आली आहे. यातच त्यांच्या राजकीय प्रवासाबद्दल जाणून घेऊ...
Who Is Raksha Khadse: आधी सरपंच, मग जिल्हा परिषद सदस्य आणि आता खासदार ते थेट केंद्रीय मंत्री; कोण आहेत रक्षा खडसे?
Who Is Raksha Khadse?Saam TV

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यासोबतच ते आज त्यांच्या नवीन मंत्रिमंडळाचीही निवड करत आहेत. यामध्ये राज्यातील एका नावाला विशेष स्थान देण्यात आलं आहे. हे नाव आहे एकनाथ खराडे यांची सून आणि भाजप नेत्या रक्षा निखिल खडसे यांचं. भाजपचा गड म्हटल्या जाणाऱ्या रावेर मतदारसंघातून रक्षा खडसे या खासदार म्हणून निवडून आल्या आहेत.

रावेर लोकसभा मतदारसंघ 2008 च्या परिसीमनानंतर अस्तित्वात आला. येथे पहिल्यांदा 2009 मध्ये निवडणूक झाली. त्यानंतर भाजपचे हरिभाऊ जावळे यांनी मोठा विजय नोंदवला होता. तेव्हापासून ही जागा सातत्याने भारतीय जनता पक्षाकडे आहे. या जागेवरून रक्षा खडसे सलग तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. आधी 2014, नंतर 2019 आणि आता 2024 मध्ये त्या रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत.

Who Is Raksha Khadse: आधी सरपंच, मग जिल्हा परिषद सदस्य आणि आता खासदार ते थेट केंद्रीय मंत्री; कोण आहेत रक्षा खडसे?
Ajit Pawar: आम्हाला एक कॅबिनेटमंत्रीपद हवं, आम्ही काही काळ वाट पाहू: अजित पवार

अशी झाली राजकीय प्रवासाची सुरुवात...

रक्षा खडसे या मूळच्या मध्य प्रदेशातील खेतिया येथील असून त्या एकनाथ खडसे यांच्या सून आहेत. कोठाडी गावात रक्षा या पहिल्यांदाच सरपंच म्हणून निवडून आल्या. यानंतर त्या जळगावच्या जिल्हा परिषदेच्या सदस्य आणि त्यानंतर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून तिकीट मिळवून खासदार झाल्या.

मिळालाय माहितीनुसार, 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादीच्या मनीष जैन यांचा सुमारे 3 लाख मतांनी पराभव करून रक्षा खडसे या खासदार म्हणून निवडून आले आहे. त्या 16 व्या लोकसभेच्या सर्वात तरुण खासदारांपैकी एक होत्या. वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी त्यांनी एकूण 6 लाख 5 हजार 452 मते मिळवून महाराष्ट्रातील ही महत्त्वाची जागा जिंकून आपली राजकीय कुवत सिद्ध केली.

Who Is Raksha Khadse: आधी सरपंच, मग जिल्हा परिषद सदस्य आणि आता खासदार ते थेट केंद्रीय मंत्री; कोण आहेत रक्षा खडसे?
Modi Cabinet 2024: नारायण राणे ते स्मृती इराणी; PM मोदींच्या नवीन मंत्रिमंडळातून या मंत्र्यांचा पत्ता कट

आनंदाश्रू आवरले जात नाहीत, सुनेच्या मंत्रीपदाने नाथाभाऊ गहिवरले

दरम्यान, रक्षा खडसे यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची बातमी समोर आल्यानंतर एकनाथ खडसे म्हणाले आहेत की, ''गेल्या अनेक वर्षांपासून घेतलेल्या परिश्रमाचे चीज रक्षाताईंच्या मंत्रीपदाच्या माध्यमातून होत आहे. माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाच्या क्षणांपैकी हा एक क्षण असून माझे आनंदाश्रू आवरले जात नाहीत.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com