BJP Strategy for Maharashtra Assembly Election Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: लोकसभेत फटका, विधानसभेत सावध पवित्रा! भाजपने विधानसभेसाठी काय केली आहे मायक्रो प्लॅनिंग? जाणून घ्या

BJP Strategy for Maharashtra Assembly Election: लोकसभेतील सुमार कामगिरीनंतर भाजपनं विधानसभा निवडणुकांसाठी कंबर कसलीये. विशेषतः अमिच शाहंनी मुंबईवर लक्ष केंद्रित केलंय. त्यामुळे विधानसभेसाठी भाजप अलर्ट झालायं.

Tanmay Tillu

लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात मोठा फटका बसल्यानंतर आता खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केलंय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाहांनी महाराष्ट्रात बैठकांचा धडाका लावलाय. नुकताच अमित शहा यांनी विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र दौरा केला. यानंतर आता अमित शाहांच्या टार्गेटवर मुंबई असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

विधानसभा निवडणुकांच्या मोर्चेबांधणीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात अमित शाहांनी निवडणुकीची रणनिती मांडताना शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना रोखायचं, अशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या.

तसेच आपल्याला उद्धव ठाकरे, शरद पवारांचे राजकारण संपवायचे आहे, असेही त्यांनी म्हटले. यानंतर आता अमित शहा यांनी मुंबईवर टार्गेट केलंय.

मुंबईसाठी अमित शहांचं विशेष प्लॅनिंग

अमित शहा यांनी मुंबईतील डेंजर झोनमधील मतदारासंघांचा विभागनिहाय आढावा घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. ते मुंबईत कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. पुढील 3 दिवस मतदारसंघ पिंजून काढा, पदाधिकाऱ्यांना आदेश त्यांनी असे आदेश दिले आहेत. मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा रिपोर्ट तयार करा, असंही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

लोकसभेला तोंड पोळलेल्या महायुतीनं आणि विशेषतः भाजपनं विधानसभा निवडणुकांसाठी कंबर कसलीये. त्यामुळे विधानसभेसाठी भाजप मायक्रो प्लॅनिंग करतयं. एकेका जागेवर भाजप लक्षकेंद्रीत करताना दिसतंय. यासाठी संघही भाजपसाठी मैदानात उतरलायं. त्यामुळे आगामी विधानसभेची गणितं बदलून भाजप इतिहास घडवणार का हेच पाहायचं..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पाणी मिळत नसल्याने तरुणाचा महानगरपालिकेत संताप; उपआयुक्तांच्या कार्यालयात घातला गोंधळ

Maharashtra Drought: राज्यात आणखी ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर, यादीत तुमचा तालुका आहे का? वाचा

आयटीआयमध्ये मिळणार पाळीव प्राण्यांची काळजी घेण्याचे प्रशिक्षण, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार

Jaw reconstruction surgery: जबड्याच्या कॅन्सरची गाठ काढल्यानंतर चेहरा विद्रूप होण्याची भीती सोडा! आधुनिक शस्त्रक्रियेमुळे पुन्हा मिळेल चेहऱ्याचा मूळ आकार

Nail Cancer: नखांच्या कॅन्सरची सुरूवातीची लक्षणं कोणती? वेळीच व्हा सावध

SCROLL FOR NEXT