Airoli Katai Naka Freeway Palava
महाराष्ट्र

Airoli Katai Naka Freeway: डोंबिवली-बदलापूरकरांचा प्रवास सुकर होणार; ऐरोली-काटई नाका महामार्गाबाबत समोर आली मोठी अपडेट

Airoli Katai Naka Freeway: मुंबईवरून कल्याण-डोंबिवली आणि बदलापूरला पोहोचवणाऱ्या ऐरोली - काटई महामार्गाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

Vishal Gangurde

सिद्धेश म्हात्रे

Navi Mumbai News: मुंबईवरून कल्याण-डोंबिवली आणि बदलापूरला पोहोचवणाऱ्या ऐरोली - काटई महामार्गाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या महामार्गाचे ७० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे लवकरच हा मार्ग वाहनधारकांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

२० मिनिटांत पूर्ण

मिळालेल्या माहितीनुसार, ऐरोली-काटई महामार्गाच्या पारसिक हिल डोंगररांगातील बोगद्याचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे हा महामार्ग हा पुढील वर्षीच्या मे महिन्यात ऐरोली-काटई रस्ता वाहतुकीसाठी खुला होण्याच्या शक्यता आहे.

या कामाचा आढावा खासदार राजन विचारे यांच्याकडून घेण्यात आला. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यास कल्याण-डोंबिवली, बदलापूर तसेच नवी मुंबईकरांना मोठा लाभ होणार आहे. या महामार्गामुळे दीड ते दोन तासांचा प्रवास अवघ्या २० मिनिटांत पूर्ण होणार आहे.

असा आहे मार्ग?

ऐरोली-काटई नाका जोडरस्ता व भुयारी मार्ग पूर्ण झाल्यास नवी मुंबई-डोंबिवली प्रवास केवळ २० मिनिटांत करता येणार आहे. या महामार्गाचे १२.३० किमी लांबीच्या या रस्त्याचे काम तीन टप्प्यात पूर्ण करण्यात येणार आहे. ऐरोली-काटई नाका हा एमएमआरडीमार्फत राबविण्यात येत आहे.

दरम्यान, हा प्रकल्प राबविताना काही ठिकाणी वाहनांची आणि पादचाऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाछी एमएमआरडीएने नियंत्रण कक्षाचीही स्थापना केली आहे. या प्रकल्पादरम्यान लोकांची गैरसोय होऊ नये, यासाठी नियंत्रण कक्ष मदत करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Masala Papad Recipe: हॉटेलस्टाईल मसाला पापड घरी कसा बनवायचा?

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना उबाठा गटाचे आंदोलन

Pune Politics : अमोल कोल्हे यांना मोठा धक्का; जवळच्या कार्यकर्त्याचा शिवसेनेत प्रवेश, पुण्यातील समीकरण बदलणार?

नाशिकमधील नामांकित ज्वेलरी दुकानात चोरी, नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ

PM Kisan Yojana: महत्त्वाची बातमी! या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसानचा पुढचा हप्ता; कारण काय?

SCROLL FOR NEXT