Anil Patil News Saam tv
महाराष्ट्र

Anil Patil News: लेक कॅबिनेट मंत्री; आई आजही शेतात राबते, साधी राहणी असणाऱ्या आईच्या लेकाचा कसा आहे राजकीय प्रवास?

Anil Patil News: आजही एसटीने प्रवास करणाऱ्या आईचा लेक मंत्री अनिल पाटील यांचा राजकीय प्रवास जाणून घेऊयात.

साम टिव्ही ब्युरो

Anil Patil Mother News: सोशल मीडियावर मंत्री अनिल पाटील यांच्या आईच्या साधी राहणीची जोरदार चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी मंत्री झालेल्या अनिल पाटील यांची आई आजही एसटीने प्रवास करते. त्याचबरोबर शेतीही करते. आजही एसटीने प्रवास करणाऱ्या आईचा लेक मंत्री अनिल पाटील यांचा राजकीय प्रवास जाणून घेऊयात. (Latest Marathi News)

आमदार अनिल पाटील यांनी 2 जुलैला मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्या बंडाला साथ देत अनिल पाटील सरकारमध्ये सामील झाले. अनिल पाटीलांनी मंत्रीपदाची शपथ घेतली, अनिल पाटील मंत्री झाले. सध्या अनिल पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. ही चर्चा त्यांना मिळालेल्या मंत्रिपदामुळे नाही तर त्यांच्या मातोश्री पुष्पाबाई पाटील यांच्यामुळे सुरू आहे.

मुलाने मंत्रिपदाची शपथ घेतली तरीही त्या एसटीने प्रवास करतात आणि शेतीची देखभाल देखील करतात. लेक मंत्री झाला तरी पुष्पाबाई एसटीनं ये-जा करतात त्यामुळे त्यांची जोरदार चर्चा सुरू आहे.

पुष्पाबाई पाटील यांचा एक फोटो सध्या सोशल मिडीयावर फिरत आहे. हा फोटो वाहक मनोज पाटील यांनी पोस्ट केला आहे. मंत्री अनिल पाटील यांच्या आई आपल्यासोबत बसने प्रवास करत आहेत हे कळताच. वाहक मनोज पाटील यांनी पुष्पाबाईंच्या साधेपणाचा हा क्षण आपल्या मोबाइलमध्ये टिपला. मुलगा मंत्री असूनही त्या बसने प्रवास करताहेत, याचं मला खूप कौतुक आहे, असंही वाहक मनोज पाटील म्हणाले. तर यानंतर पुष्पाबाई पाटील यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

पुष्पाबाई पाटील या रोज एसटी बसने प्रवास करतात. एसटी बसने त्या सोमवारी सकाळी अमळनेरहून हिंगोणे या गावी त्या आपल्या शेतात पोहोचल्या. आधीपासूनचा त्या साधेपणाने राहतात. मुलाला पद मिळाल्यानंतरही त्यात बदल झालेला नाही.लेकाला मंत्रिपद मिळालं तेव्हा देखील त्या शेतात काम करत होत्या. लेकाला मंत्रिपद मिळाल्याचं कळताच त्यांना मोठा हर्ष झाला.

अनिल पाटील कोण आहेत?

अनिल पाटील हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील रहिवासी आहेत. अमळनेर तालुक्यातील मारवड-डांगरी गटातून ते प्रथम भाजपचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते. तसेच त्यांनी मॅनेजमेंटमध्ये डिग्री प्राप्त केली आहे.

अनिल पाटील यांनी अमळनेर बाजार समिती सभापती पदावर दहा वर्ष राजकारण केले. त्यांनतर जिल्हा बँक संचालक म्हणून १५ वर्ष कार्यरत होते. जळगाव दूध संघाच्या संचालक पदावर ५ वर्ष होते. तसेच जळगाव जिल्हा परिषद सदस्य म्हणून १० वर्ष काम पाहिले आहे.

सुरुवातीला ते भाजप पक्षात होते. 2014 ला त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती, मात्र मोदी लाट असतानाही पाटील यांना परभव स्वीकारावा लागला. त्यांनतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

2019 मध्ये राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत विजय संपादन केलं. अनिल पाटील हे राष्ट्रवादी पक्षाच्या मुख्य प्रतोद म्हणून कार्यरत होते. आता त्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुनील तटकरेंच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

Maharashtra News Live Update: Mumbai: पवई पोलिसांची अवैध डिझेल साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई.

तटकरे जन्माला आले तेव्हाच...; शिंदेसेनेच्या आमदाराची जीभ घसरली, काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणुका कधी होणार? तारखांबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT