Kishore Jorgewar News, Political Crisis in Maharashtra saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : 'नव्या घडामोडींमुळे महाराष्ट्रात बदल घडेल असे वाटत नाही'

आज (मंगळवार) सकाळपासून राजकीय घडामाेडींना वेग आला आहे.

संजय तुमराम

चंद्रपूर : विधान परिषद निवडणुकीत सत्ताधा-यांना (mva) भारतीय जनता पक्षाने (bjp) दणका दिल्यानंतर राज्यात राजकीय भुकंप हाेणार असे चित्र आज (मंगळवार) सकाळपासून निर्माण झाले आहे. शिवसेनेचे (shivsena) काही आमदारांचा फाेन लागत नसल्याने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार (kishore jorgewar) यांनी चापलुसांना संधी दिल्याने असे निकाल लागले असे वक्तव्य केल्याने राजकीय मंडळींच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. (kishore jorewar latest marathi news)

चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी विधान परिषद निवडणूक आणि एकनाथ शिंदे नॉट रिचेबल प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. विधान परिषद निवडणुकांचे निकाल विद्यमान राजकीय पक्षांचे डोळे उघडणारे असल्याचे मत त्यांनी मांडले. राज्यसभा निवडणुकीत अपक्षांवर घोडेबाजाराचा आरोप झाल्याची आठवण त्यांनी करून दिली. (Political Crisis in Maharashtra)

आजच्या ताज्या निकालात मात्र प्रस्थापित राजकीय पक्षांचे आमदार नाराज असल्याचे सिद्ध झाल्याचे मत आमदार जोरगेवार यांनी व्यक्त केले. निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून चापलुसांना संधी दिल्याने अशी स्थिती निर्माण होते, असा टोलाही आमदार जोरगेवार यांनी लगावला आहे. नव्या घडामोडींमुळे राज्य सरकारमध्ये काही बदल घडेल, असे वाटत नसल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips: वास्तुनुसार 'या' मूर्ती घरात ठेवा, सुख शांती मिळेल

Maharashtra News Live Updates: योगींच्या 'बटेंगे तो कटेंगे' घोषणेला देवेंद्र फडणवीस यांचं समर्थन

Winter Drinks: हिवाळ्यात हे आरोग्यदायी पेय प्या आणि शरीराला ठेवा उबदार

असंख्य घरांमध्ये लपलीये एक मांजर; तुम्ही १० सेकंदात शोधून दाखवाच!

Solapur Airport : सोलापूरकरांसाठी मोठी गुडन्यूज! 'या' तारखेपासून सुरू होणार विमानसेवा, मुंबई-गोव्याला काही तासात पोहचणार!

SCROLL FOR NEXT