Kirtankar Indurikar Maharaj quit kirtan saam tv
महाराष्ट्र

Indurikar Maharaj: 'मला बोला, माझ्या मुलीचा काय दोष?' ग्यान देणारे इंदोरीकर कीर्तन सोडणार?

Kirtankar Indurikar Maharaj: लेकीच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमातील बडेजावामुळे इंदोरीकर महाराजांना टीकेचं धनी व्हायला लागलंय. समाजमाध्यमांमधून मोठ्या प्रमाणात टीकेचे बाण आल्याने घायाळ झालेल्या इंदरीकर महाराजांनी किर्तनच सोडण्याचे संकेत दिलेत. नक्की काय बोललेत महाराज पाहूया या रिपोर्टमधून.

Girish Nikam

  • इंदोरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्याचा जंगी सोहळा चर्चांच

  • साधेपणाचे गोडवे गाणारे इंदोरीकर महाराज सोशल मीडियावर ट्रोल

  • महाराजांनी किर्तन सोडण्याचे संकेत दिले आहेत.

ग्यान देणारे इंदोरीकर महाराज खरंच किर्तन करणं सोडणार? इंदोरीकर महाराजांनी हे वक्तव्य केलंय ते मुलींच्या साखरपुड्यानंतर, त्याचं झालं असं की इंदोरीकर महाराज त्यांच्या किर्तनातून लग्न कसं करावं यांचं बरचं ग्यान द्यायचे कसं ते बघा. प्रत्यक्षात मात्र इंदुरीकर महाराजांनी आपली मुलगी ज्ञानेश्वरी देशमुखचा साखरपुड्याचा कार्यक्रम एकदमच जंगी केला.

महागड्या गाड्यांचा ताफा राजेशाही थाटात कन्या आणि जावयाची रथावरून निघालेली मिरवणूक.डोळे दिपून टाकणारा झगमगाट. हेच ठरलं त्यांच्यावरच्या टीकेचं कारण. कारण जे महाराज किर्तनात साधं लग्न केली तरी मुलं होतात असा उपदेश करतात. तेच महाराज स्वताच्या लेकीच्या साखरपुड्यासाठी मात्र वारेमाप खर्च करतात. हे अनेकांना पटलं नाही.

अहो चप्पल कुठं शोभती? बायको आहे ती. तिनं त्या मापात असावं, अशी वादग्रस्त वक्तव्य करणा-या महाराजांनी लेकीच्या साखरपूड्यात जो बडेजाव दाखवलाय. त्यावरुन चोहोबाजूनी टीका झाली आणि मग इंदुरीकर महाराजांनी काय स्पष्टीकरण दिलंय ऐका. त्यामुळे हा आता खरंच इंदोरीकर महाराज निवृत्त होऊन आपल्याच वक्तव्यांबाबत चिंतन करणार का? आणि यापुढे ग्यान वाटताना विचार करणार का, ते पाहायचं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Benefits Of Amla In Pregnany: गरोदर महिलेने आवळा खावा की नाही?

Maida Effects on Health: जास्त प्रमाणात मैद्याचे पदार्थ खल्ल्याने शरिरात कोणते बदल होतात?

छत्रपती शिवाजी महाराजांचा नजरकैदेतून सुटून पेटाऱ्यातून पळण्याचा संपूर्ण प्लॅन काय होता?

Kurkurit Mirchi Recipe: वडापावच्या गाडीवर मिळणारी बेसनातली कुरकुरीत मिरची घरी कशी बनवाल?

Maharashtra Government: जमिनीच्या वापरासंदर्भात ऐतिहासिक निर्णय, NA परवानगीमधील 'ही' अट्ट रद्द

SCROLL FOR NEXT