Indorikar Maharaj speaking during his daughter’s engagement ceremony — video of his reply to criticism is going viral. 
महाराष्ट्र

हे तुम्हाला दाखवण्यासाठीच...; मुलीच्या महागड्या साखरपुड्यावरून टीकाकारांना कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं उत्तर

Kirtankar Indorikar Maharaj : मुलीचा भव्य साखरपुड्याच्या समारंभाबद्दल सोशल मीडियावर टीका झाल्यानंतर कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी तीव्र प्रतिक्रिया दिलीय.

Bharat Jadhav

  • इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा महागडा साखरपुडा सोशल मीडियावर चर्चेत

  • खर्चावरून टीका झाल्यानंतर महाराजांची सडेतोड प्रतिक्रिया.

  • कार्यक्रमातील भाषणाचा व्हिडिओ व्हायरल

प्रसिद्ध कीर्तनकार आणि समाज प्रभोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलंय. इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा साखरपुड्याचा कार्यक्रम दिमाखात पार पडला. त्यावरून अनेकांनी त्यांच्यावर टीका केली होती. लोकांच्या या टीकेला कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी उत्तर दिलंय.

मुलीच्या साखरपुडा इतका बडेजाव का केला? असा सवाल अनेकांनी केला. इंदोरीकर महाराज आपल्या प्रत्येक किर्तनात लग्न साध्या पद्धतीने करा, असं सांगतात. मग त्यांनी आपल्या मुलीच्या साखरपुड्यात एवढा खर्च का केला? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. त्याला आता इंदुरीकर महाराज यांनी उत्तर दिलंय. साखर पुड्याच्या कार्यक्रमातच त्यांनी आपली बाजू स्पष्ट केली. त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

इंदोरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी देशमुख आणि साहिल चिलाप यांचा नुकताच साखरपुडा झाला. साहिल चिलाप हे बांधकाम व्यावसायिक असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांचा मुंबईमध्ये मोठा व्यवसाय आहे. यासोबतच त्यांच्या मुळ गावी पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरमध्ये त्यांची बागायती शेती आहे.

कीर्तनातून लग्न साध्या पद्धतीने करण्याचा सल्ला देणाऱ्या इंदोरीकर महाराजांनी मुलीच्या साखरपुड्यात मात्र मोठा गाजावाजा करत लाखो रुपयांचा खर्च केल्याचा आरोप केला जातोय. या साखरपुड्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. याच कार्यक्रमात आपल्या कीर्तनाचा संदर्भात देताना इंदोरीकर महाराज म्हणाले, "इंदोरीकर महाराज कंबर बांधून बांधून लोकांना सांगतात की लग्न साधे करा.. मग त्यांनी एवढा मोठा बडेजाव का केला? तर तुम्हाला दाखवण्यासाठी हा बडेजाव केला.जेणेकरून आपण बदल करू शकतो " दाखवता येईल.

इंदोरीकर महाराजांनी काय केला बदल? खर्चावर काय म्हणाले?

विशिष्ट लोकांना फेटे बांधणे आणि विशिष्ट लोकांनी त्यांच्याकडे पहाणे यात आपण बदल केलाय. थोडे लोक मला नाव ठेवतील पण ठेवू द्या, गेले ३० वर्ष लोक मला नावच ठेवत आलेत. पण आता बदल करायचा तो असा, इथून पुढे विशिष्ट लोकांचा सत्कारच करायचा नाही, करायचा तर सगळ्यांचा, नाहीतर नाही. त्यामुळे आजच्या या कार्यक्रमात मी ठरवून टाकलं की या कार्यक्रमाला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला पांडूरंगाची मूर्ती द्यायची. ही मूर्ती कायम त्यांच्या देवघरात राहील. सर्व सामान्य व्यक्ती त्या मूर्तीला अगरबत्ती लावेल. त्यामुळे सत्कार नावाची गोष्ट आपण बंदच केली. हा एक बदल आपण या कार्यक्रमात केला.

दुसरी गोष्ट म्हणजे अनेकांची तक्रार आहे, इंदोरीकर महाराज प्रत्येक किर्तनात सांगतात लग्न साधे करा, मग मी या साखरपुड्यात एवढा खर्च का केला तर त्याचं उत्तर असं आहे, तो खर्च तुम्हाला दाखवण्यासाठी केला. तुम्हाला हे दाखवण्यासाठी केला की आपण बदल करू शकतो. बदल करण्याची आपली ताकद आहे. जेवण आपण महाराष्ट्रीयनच ठेवलंय. कारण आपलं 96 कुळी खानदान आहे, चायनीज वगैरे आपल्याकडे चालणार नाही असे इंदोरीकर महाराज म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

Ashish Deshmukh: 'जास्त कराल तर कापून काढू'; आमदार आशिष देशमुखांची विरोधकांना धमकी

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार; तब्बल १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार

SCROLL FOR NEXT