शिवसेना नेत्याच्या जमीनदोस्त बंगल्यासोबत फोटो; सोमय्यांचा नवा सेल्फी  twitter @KiritSomaiya
महाराष्ट्र

शिवसेना नेत्याच्या जमीनदोस्त बंगल्यासोबत फोटो; सोमय्यांचा नवा सेल्फी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांचे स्वीय सहायक आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या दापोली मधील अवैध बंगल्यावर ऑगस्ट महिन्यामध्ये कारवाई करण्यात आली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रत्नागिरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे स्वीय सहायक आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्या दापोली मधील (Dapoli) अवैध बंगल्यावर ऑगस्ट महिन्यामध्ये कारवाई करण्यात आली होती. भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी तक्रार दाखल केली होती. (kirit somaiya share selfie at demolished bungalow of milind narvekar)

हे देखील पहा-

यानंतर रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यामधील दापोलीत समुद्र किनारी असलेला बंगला पाडण्यात आला होता. आता किरिट सोमय्या यांनी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोमय्या यांनी फोटो शेअर करताना सांगितले आहे की, दापोली समुद्र किनाऱ्यावरील मिलिंद नार्वेकर (शिवसेना) यांचा जमीनदोस्त झालेला बंगला.

फोटोमध्ये जुलै महिन्यामधील बंगल्याचा फोटो दिसत आहे, तर त्याच ठिकाणी डिसेंबरमध्ये बंगला पाडल्यानंतरचा दुसरा एक फोटो सोमय्या यांनी यावेळी पोस्ट केले आहेत. नार्वेकर यांनी बंगल्याचे बांधकाम करताना सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप शिवसेना नेते किरिट सोमय्या यांच्याकडून लावण्यात आला होता.

याकरिता वेगवेगळ्या पातळीवर सोमय्या यांनी तक्रार दाखल केली होती. कायद्याचे उल्लंघन करत झालेल्या या बांधकामावर कारवाई नंतर किरिट सोमय्या यांनी आपण स्वत: बंगला पाडल्यानंतर बघायला जाऊ असे यावेळी सांगितले होते.(kirit somaiya share selfie at demolished bungalow of milind narvekar)

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5 Things You Should Never Give to Others: या 5 गोष्टी चुकूनही दुसऱ्याला देऊ नका

Maharashtra News Live Update: पवई IIT च्या गेटवर युवक काँग्रेसकडून आंदोलन

5 Gram Gold Mangalsutra: 5 ग्रॅम सोन्यामध्ये महिलांसाठी सुंदर मंगळसूत्र; पाहा लेटेस्ट 5 डिझाइन्स

मुंबईच्या ५ स्टार हॉटेलमध्ये जेवायला गेले अन् ताटात काय दिसलं? प्रसिद्ध डॉक्टरांचा थेट तुकाराम मुंढेंकडे संताप

Shocking: स्नानासाठी तलावात डुबकी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ६ मुलांचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT