नागपूर विधान परिषद निवडणूक: भाजपचे बावनकुळे विजयी, काँग्रेसला धक्का

विधान परिषदेच्या नागपूर जिल्हा स्थानिक स्वराज्य मतदार संघाच्या निवडणुकीचा निकाल भाजपच्या (BJP) बाजुने लागला
नागपूर विधान परिषद निवडणूक: भाजपचे बावनकुळे विजयी, काँग्रेसला धक्का
नागपूर विधान परिषद निवडणूक: भाजपचे बावनकुळे विजयी, काँग्रेसला धक्काSaam Tv

नागपूर : विधान परिषदेच्या (Nagpur Legislative Council Election Results) नागपूर जिल्हा स्थानिक स्वराज्य मतदार संघाच्या निवडणुकीचा निकाल भाजपच्या (BJP) बाजुने लागला आहे. एकतर्फी विजय झाला आहे. भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे (BJP candidate Chandrashekhar Bawankule) हे विजयी झाले आहेत. भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत झाली होती. (Nagpur Legislative Council Election)

हे देखील पहा-

नागपूर (Nagpur) विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये (Election) महाविकास आघाडीचा पराभव झाला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपकडून (BJP) व्यक्त करण्यात येत आहे. मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असतानाच भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आघाडी घेतली होती. माजी ऊर्जा मंत्री तसेच भाजपचे प्रदेश महासचिव चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध काँग्रेसने पाठिंबा दिलेले अपक्ष मंगेश देशमुख यांच्यात थेट लढत झाली.

नागपूर विधान परिषद निवडणूक: भाजपचे बावनकुळे विजयी, काँग्रेसला धक्का
नागपुरात बावनकुळेंचा विजय निश्चित; निकालाची अधिकृत घोषणा बाकी

559 मतदारांपैकी 554 मतदारांनी या निवडणुकीत हक्क बजावला. यात बावनकुळे यांना 362 मते मिळालीत तर मंगेश देशमुख यांना 186 मते मिळालीत. तर 5 मते बाद झालेत. तसेच भाजपमधून काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेले छोटू भोयर यांना केवळ एक मत मिळाले.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com