sharad pawar kirit somaiya uddhav thackeray
sharad pawar kirit somaiya uddhav thackeray 
महाराष्ट्र

ठाकरे- पवार सरकारला एक दिवस महाराष्ट्र सस्पेंड करेल : साेमय्या

संजय जाधव

बुलढाणा : ज्या प्रमाणे उद्धव ठाकरे व शरद पवारांनी राज्यात माफियागिरी, दादागिरी एसटी कर्माच्याऱ्यांवर दाखविली आहे त्याची महाराष्ट्रातील जनतेला लाज वाटतंय. राज्यातील तीन डझन एसटी कर्मचा-यांनी आत्महत्या केल्या. कर्मचा-यांना पगार वेळेवर देत नाहीत. हे लोक वसुलीचा पैसा गोळा करून मोजण्यात मग्न आहेत. ठाकरे पवारांना चेतावणी द्यायची आहे की संपूर्ण महाराष्ट्र हा एसटी कर्मचा-यांसोबत उभा आहे. तुम्ही दाेन हजार कर्मचा-यांना सस्पेंड केले आहे ना, लक्षात ठेवा ठाकरे पवार एक दिवस महाराष्ट्र हा तुम्हांला सस्पेंड करणार आहे अशी खरमरीत टीका भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी शेगाव येथे केली. kirit somaiya buldhana shegoan sharad pawar uddhav thackeray msrtc employee strike

किरीट सोमय्या हे बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात जाऊन गजानन महाराजांचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर माध्यमांशी संवाद साधला.

राज्यातील सरकारला एसटी कर्मचारी संपाकडे पहायला वेळ नाही. त्यांच्याशी चर्चा करायला वेळ नाही. दाेन हजार कर्मचा-यांचे सस्पेंड करणा-या ठाकरे पवार सरकारला एक दिवस महाराष्ट्र सस्पेंड करेल असे सोमय्या यांनी नमूद केले.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : ठाण्याच्या जागेचा मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मान्य, प्रताप सरनाईक

Arvind Kejriwal: निवडणुकीपूर्वी केजरीवालांना अटक का? कोर्टाने ईडीला विचारले हे 5 प्रश्न

Pratibha Patil: माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील घरातूनच करणार मतदान, मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण होणार

Maharashtra Politics 2024 : आमच्या कार्यकर्त्यांना धमकवलं जातंय, १३ तारखेनंतर सगळा हिशेब करू; निलेश लंकेंनी भरला दम

Kalyan News: कल्याणमध्ये रिक्षा पार्किंगवरून वाद, मारहाणीत एकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT