उद्यापासून भरा १२ वीच्या परीक्षेचा फार्म; जाणून घ्या प्रक्रिया

शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली माहिती
varsha gaikwad
varsha gaikwad
Published On

मुंबई : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमातून सन २०२२ मध्ये घेतल्या जाणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेसाठी अर्ज (फार्म) उद्यापासून (शुक्रवार, ता. १२) दाेन डिसेंबरपर्यंत स्विकारली जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने HSC अर्ज भरावीत असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड varsha gaikwad यांनी केले आहे.

या परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची परिक्षा अर्ज ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. यामध्ये उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत शास्त्र, कला व वाणिज्य शाखांची फक्त नियमित विद्यार्थ्यांची परिक्षा अर्ज SARAL डाटाबेसवरून नियमित शुल्कासह १२ नोव्हेंबर ते दाेन डिसेंबर २०२१ या कालावधीत भरावयाची आहेत.

varsha gaikwad
शरद पवारांवरील चिखलफेक महाराष्ट्र सहन करणार नाही : संजय राऊत

उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थी, आयटीआयद्वारे ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी यांची आवेदनपत्रे प्रचलित पद्धतीप्रमाणे तीन डिसेंबर ते ११ डिसेंबर २०२१ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने भरावयाची आहेत. विलंब शुल्कासह हे अर्ज १३ ते २० डिसेंबर २०२१ या कालावधीत भरता येतील. उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाचा कालावधी १२ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर २०२१ असा आहे असे मंत्री प्रा. गायकवाड यांनी नमूद केले.

उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्री लिस्ट २८ डिसेंबर २०२१ ला जमा करावयाची आहे असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी कळविले आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com