Kiran Pawaskar’s controversial remark on Balasaheb Thackeray during a Shinde Sena event triggers sharp political reactions. saam tv
महाराष्ट्र

शिंदेसेनेच्या नेत्याकडून बाळासाहेबांची खिल्ली, पावसकरांच्या लेखी शिवसेना पाळणाघर

Kiran Pawaskar’s ‘Palnaghara’ Remark On Shiv Sena: शिंदेसेनेच्या नेत्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोरच हिंदूहद्यसम्राट बाळासाहेब ठाकरेंची खिल्ली उडवलीय...त्यामुळे खासदार प्रवेशाच्या जल्लोषात शिंदेसेनेचे नेते किरण पावसकरांनी केलेल्या विधानामुळे नवा वाद पेटलाय...नेमकं काय म्हटले आहेत पावसकर आणि त्यावरून कसा वाद पेटलाय ते पाहूयात..

Snehil Shivaji

24 ऑक्टोबर 2012

आपल्या आयुष्याच्या अखेरच्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांचे हे वक्तव्य लाखो शिवसैनिकांना एका मोठ्या जबाबदारीची जाणिव करुन देणारं होतं आणि या दसरा मेळाव्यानंतर अवघ्या महिन्याभरात बाळासाहेबांचे निधन झालं. शिवसैनिकांनी बाळासाहेबांनी केलेल्या या शेवटच्या आवाहनाचं तंतोतंत पालन केलं पण दहा वर्षातच बाळासाहेबांची शिवसेना फुटली...हे कमी होतं की काय त्याच्या चार वर्षानंतर पुन्हा ठाकरेसेना फोडण्यात आली आणि 6 खासदारांनी शिंदेंगटात प्रवेश केला. याच प्रवेश सोहळ्यात राष्ट्रवादीतून शिवसेनेत आणि पहिल्या फुटीनंतर शिंदेसोबत गेलेले माजी आमदार किरण पावस्करांनी जाहीरपणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांची खिल्ली उडवली. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह साऱ्या आमदार-खासदारांसमोर त्यांनी हे धाडस केलं...

ऐकलंत. ज्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी 2005 मध्ये याच किरण पावस्करांना आमदार केलं. त्याच पावस्करांनी बाळासाहेबांच्या आवाहनाची खिल्ली उडवत शिवसेना पाळणाघर आहे का अशी बोचरी टिका केली. परंतू थेट बाळासाहेबांच्या आवाहनाची खिल्ली उडवणाऱ्या किरण पावस्करांना रोखण्याचं धाडस बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना म्हणत शिवसेनेचा ताबा घेणाऱ्या एकालाही झालं नाही. परंतू पावस्करांच्या या वक्तव्याचा ठाकरे गटानं खरपूस समाचार घेतला...

शिवसेनेनं पावसकरांना आमदारकीसह भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून विविध पदं दिली. त्याच शिवसेनेला पाळणाघर म्हणत थेट शिवसेनाप्रमुखांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली. मात्र एवढं सर्व होऊनही पावस्करांनी माफी तर सोडा उलट पत्रकार परिषद घेऊन ठाकरेंवरच टीकेचा भडीमार केला. राजकारणात पक्ष बदलणं नवं नाही... मतभेदही नवे नाहीत... पण ज्यांच्या नावावर राजकीय कारकीर्द उभी राहिली, त्यांच्याच शब्दांची सार्वजनिक खिल्ली उडवली जाऊ लागली, तर तो केवळ राजकीय वाद राहत नाही... तो राजकीय संस्कारांचा मुद्दा बनतो. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या आवाहनाचा मान राखणंही आवश्यक वाटत नाही का? विशेष म्हणजे त्यांच्या पक्षाला हे मान्य नव्हतं तर त्याच मंचावर यावर भूमिका का स्पष्टे केली नाही हा खरा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pav Bhaji Recipe : मुंबई स्टाईल पावभाजी घरच्या घरी कशी बनवायची? सीक्रेट रेसिपी आताच लिहून घ्या

Maharashtra News Live Update: मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवड घाटात वाहतूक कोंडी

शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेत सामील होणार? मी तुम्हाला इतिहासात नेते म्हणत सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा

लाडक्या बायकोसाठी चांदीच्या जोडव्याचे 5 सुंदर डिझाईन्स

Nashik News: भावली धबधबा मारहाण प्रकरण, पर्यटकांना मारहाण करतानाचा नवा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT