नागपूर: खेकरानाला परिसरात इसमाची हत्या; खूनाच्या ठिकानाबद्दल साशंकता मंगेश मोहिते
महाराष्ट्र

नागपूर: खेकरानाला परिसरात इसमाची हत्या; खूनाच्या ठिकानाबद्दल साशंकता

नागपूर जिल्ह्यातील खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडेगावच्या जंगलातील खेकरानाला परिसरात एका इसमाचा मृतदेह आढळून आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मंगेश मोहिते

नागपूर: नागपूर जिल्ह्यातील खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडेगावच्या जंगलातील खेकरानाला परिसरात एका इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. प्रदीप जनार्धन बागडे ( वय ४७) असे मृताकाचे नाव आहे. मृतक प्रदीपचा खून चार ते पाच दिवसांपूर्वी झाला असल्याचा संशय पोलिसांनी असून हत्या अन्य ठिकाणी केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेह बडेगावच्या जंगलात फेकला असावा असा अंदाज खापा पोलिसांनी प्राथमिक तपासात बांधला आहे.

हे देखील पहा-

सध्या पावसाळा असल्याने अनेक उत्साही लोक जंगलात पर्यटन करण्यासाठी जात आहेत. त्यातील काही लोकांना खेकरानाला येथील महारकुंड शिवारातील एका पुलाखाली एका इसमाचा मृतदेह दिसला. त्यानंतर त्या लोकांनी या संदर्भात माहिती खापा पोलिसांना दिली. माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला.

खिशात सापडलेल्या ओळखपत्रावरून ओळख;

मृतदेह पाहिल्यावर केल्यावर मृतकाच्या खिशात सापडलेल्या ओळखपत्रावरून मृतदेह प्रदीप जनार्धन बागडे असल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठवला आहे,या प्रकरणात पोलिसांनी अद्याप कुणालाही चौकशीसाठी ताब्यात घेतले नसली तरी मृतक प्रदीपचा कोणासोबत वाद होता का या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

आरोपींनी लपवला मृतदेह;

प्रदीप बागडेचा मृतदेह आरोपींनी महारकुंड शिवारातील पुलाखाली असलेल्या सिमेंटच्या पयलीमध्ये लपवला होता. प्रदीपचा खून इतरत्र कुठे केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी मृतदेह सीमेंटच्या पयलीमध्ये लपवून ठेवला असावा असा संशय आहे. मात्र जंगलातील प्राण्यांनी तो मृतदेह बाहेर ओढल्याने ही घटना उघडकी आली आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati : अमरावती जिल्ह्यात ३५ टक्के शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून दूरच; शासनाची हमी हवेतच

Maharashtra Politics : दिवाळीत धमाका! भाजपच्या गळाला मोठा मासा, ६ टर्म आमदार कमळ घेण्याच्या तयारीत

Maharashtra Live News Update : दिवाळीनिमित्त पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल

छत्रपती शिवाजी महाराज दिवाळी कसे साजरी करायचे? पाहा हे दुर्मिळ ७ फोटो

रक्तप्रवाहात अडथळा, नसा बंद पडण्याची भीती? खा १ फळ, हार्ट अटॅकचा धोका टळेल

SCROLL FOR NEXT