mns, khed, ratnagiri, police, arrest, vaubhav khedekar Saam Tv
महाराष्ट्र

MNS News : 'मनसे' च्या पदाधिका-यांना अटक, न्यायालयानं सुनावली पाेलिस काेठडी

पाेलिस वैभव खेडेकर यांचा शाेध घेताहेत.

साम न्यूज नेटवर्क

- जितेश काेळी

MNS News : रत्नागिरी (ratnagiri) जिल्ह्यातील खेड येथे मनसेच्या (mns) तीन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पाेलिसांनी नुकतीच अटक केली. या तिघांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. रस्ते आस्थापना जिल्हा संघटक दादू नांदगावकर, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष प्रसाद शेट्ये व केदार वणंजू अशी पाेलिस काेठडी सुनावलेल्यांची नावे आहेत. (Ratnagiri Latest Marathi News)

मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या पाठोपाठ आता मनसेच्या कार्यकर्त्यांच्या अडचणीत देखील वाढ झाली आहे. गणेशोत्सवातील लॉटरी घोटाळा प्रकरणात मनसेच्या तीन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना खेड पोलिसांनी गुरुवारी अटक केली.

रस्ते आस्थापना जिल्हा संघटक मिलिंद उर्फ दादू नांदगावकर, विद्यार्थी सेनेचे तालुकाप्रमुख प्रसाद शेट्ये व केदार वणंजू या मनसेच्या (mns) तिघांना पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता या तिघांनाही तीन दिवसांची पोलीस (police) कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयात आज (शुक्रवार) वैभव खेडेकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होणार असल्याची माहिती प्राप्त होत आहे. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून वैभव खेडेकर हे नॉट रीचेबल असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT