Pratibha Dhanorkar, Shyam Barve Viral Video  Saam TV
महाराष्ट्र

खासदार श्याम बर्वे यांच्यासोबतच्या व्हायरल व्हिडीओवर अखेर प्रतिभा धानोरकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या....

Pratibha Dhanorkar, Shyam Barve Viral Video : खासदार श्याम बर्वे यांनी बसमध्ये प्रतिभा धानोरकर यांच्या गालाला हात लावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला. यावर खासदार धानोरकर यांनी साम टीव्हीशी बोलताना हा प्रकार मस्करीतून घडल्याचे स्पष्ट केले.

Namdeo Kumbhar

संजय तुमराम, चंद्रपूर प्रतिनिधी

Shyam Barve Pratibha Dhanorkar Viral Video : काँग्रेस खासदार बसमध्ये बसलेले असताना खासदार श्याम बर्वे यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गालावर टपली मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर मोठा वादंग निर्माण झाला. नागपूर काँग्रेस वर्कर या मेल आयडीवरून मेल करण्यात आला. या वागणुकीवर आक्षेप घेण्यात आला होता. यावरून सत्ताधाऱ्यांनी काँग्रेसच्या संस्कृतीवर टीकेची झोड उठवली. पण या संपूर्ण प्रकरणात नेमकी सत्यता किती आणि काय? खासदार धानोरकर काय भूमिका घेणार? याची चर्चा सुरू आहे. यासंदर्भात प्रतिभा धानोरकर यांनी साम टीव्हीसोबत बोलताना भूमिका स्पष्ट केली. तसेच मेलविरोधात कारवाई कऱण्याची भूमिका घेतली. प्रतिभा धानोरकर यांनी साम टीव्हीसोबत बोलताना बर्वे भावासारखे आहेत. बसमधील सर्व प्रकार हा गमतीशीरपणाने होता, माझी कुठेही तक्रार नाही, तक्रार करणारे कोण मला माहिती नाही, असे त्या म्हणाल्या.

रामटेकचे खासदार श्याम कुमार बर्वे यांनी चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांना बसमध्ये गालावर मारल्याचं व्हिडीओक दिसत आहे. काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी याबद्दल मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, सोनिया गांधी आणि केसी वेणू गोपाल यांच्याकडे ई-मेल द्वारे तक्रार केल्याची चर्चा समोर आली. पण ही तक्रार करणारा कोण अद्याप उघड नाही. तक्रार केल्याचे स्क्रीन शॉट्स समोर आले आहेत. खासदार बर्वे यांच्या वर्तनामुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का लागल्याचा दावा त्यात करण्यात आला आहे.

प्रतिभा धानोरकर काय म्हणाल्या ?

कॉन्स्टिट्यूशन क्लबपासून आम्ही सगळे जण रामलीला मैदानावर एका गाडीने बसून जात होतो. माझ्या समोरच्या सीटवरती शोभाताई बच्छाव बसल्या होत्या, वर्षाताई गायकवाड आणि मी एका सीटवरती बसली होती. माझ्या मागे देखील प्रशांत पडोडे, श्यामभाऊ सगळे लोक होते. असं असताना काही झारखंडचे आणि राजस्थानचे खासदार आमच्या बाजूला होते. श्यामभाऊ तिकडनं नवीन ड्रेस घालून आले. नवीन ड्रेस घालून आल्यामुळे ते खासदार वर्षताईला विचारत होते की, श्यामभावेचं लग्न झालं आहे का? त्याच्यावरती वर्षताई म्हटल्या की, हा आता पंचशीत गेला आहे, हा तीसचा झाल्यानंतर आम्ही याचं लग्न करणार आहोत आणि जेव्हा करणार आहोत, तेव्हा ऑथराइज तुम्हाला सांगणार आहोत.

तिकडून श्यामभाऊ समोरून चालत आले आणि श्यामभाऊ म्हणाले की, माझा मुलगा २०-२२ वर्षाचा आहे, तुम्ही अशी मज्जा माझ्याशी का करताय. मी आता ३० वर्षाचा अजून व्हायचा, माझा लग्न व्हायचाय, अशी मस्करी का करताय म्हणत त्यांनी माझ्या गालावरती हलकासा हात लावला. नंतर वर्षताईच्या पण गालावरती केला आणि हे सगळं रेकॉर्ड झालं, असे खासदार म्हणाल्या.

श्यामभाऊ असो किंवा इतरही पक्षाचे देखील, म्हणजे फक्त काँग्रेस पक्षाचे म्हणून नाही, आम्ही गोदावरी बिल्डिंगमध्ये राहणारे सगळे खासदार हे सगळे सारख्या वयाच्या सगळे एका ठिकाणी जेवण करतो, एका ठिकाणी राहतो. आणि श्यामभाऊ हा माझ्या मोठ्या भावासारखा आहे. आणि असल्यानंतर अशा पद्धतीची न्यूज लावणं किंवा अशा पद्धतीची न्यूज व्हायरल करणं चुकीचं आहे.

तुमच्याकडे ऑथराइज्ड कुठली कंप्लेंट आहे? ऑथराइज्ड काही माहिती असली तर न्यूज लावली तर हरकत नाही. पण काहीही नसताना त्या गोष्टीत कुठलं सत्य नसताना अशा पद्धतीची न्यूज लावणं, एखाद्या महिला खासदाराची बद्नाम करणं हे अत्यंत चुकीचं आहे. आणि ज्यांनी तक्रार केली, तो तक्रार करणारा माणूस हा कोण आहे? त्याचं नाव आहे का? निनावी अशा तक्रारी, ते श्यामभावेचे विरोधक असतील, वर्षा गायकवाडचे विरोधक असतील किंवा प्रतिभा धानोरकरचे विरोधक असतील. हे कोणी एकमेकाशी तक्रार करणार आणि ऑथराइज्ड नाव किंवा तो पक्षाचा कार्यकर्ता असता तर आम्ही ते मानलं असतं.

पण असा कुठलाही प्रकार त्या ठिकाणी झाला नाही. त्याच्यामुळे आज देशात का चाललंय एवढं मोठं आंदोलन झालं, आज ५ लाखाच्या वरती लोक दिल्लीत आले, त्याच्यावरती चर्चा करायचं सोडून तुम्ही या शुल्लक गोष्टीवरती चर्चा करताय, असे खासदार म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lek Ladki Yojana: लाडक्या लेकीला मिळतील १ लाख १ हजार रुपये! घरबसल्या भरा लेक लाडकी योजनेचा अर्ज

Breast Cancer: ब्रेस्ट कॅन्सरपूर्वी शरीरात होणारे हे 5 बदल वेळीच ओळखा; 90% महिला करतात दुर्लक्ष

Farmer Protest : शेतकरी आक्रमक! पुणे-बेंगळुर महामार्गावर 22 तासांपासून रास्ता रोको; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Diwali Faral : लाडू-करंजी विसरा! यंदा दिवाळीत फराळात बनवा 'या' ७ हटके गोड रेसिपी, जिभेवर चव रेंगाळत राहील

Maharashtra News Live Update : शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोन

SCROLL FOR NEXT