Khamgaon Bandh : पाेलिसांनी (police) दंगलीचा गुन्हा नाेंदविल्याने आज (साेमवार) खामगावात (khamgaon) नागरिकांनी कडकडीत बंद पाळला आहे. या बंदमुळं शहरातील बाजारपेठेसह छाेटे माेठी दुकानांना टाळा आहे. कायदा व सुवव्यवस्था राखण्यासाठी शहरातील चाैका चाैकात पाेलीस बंदाेबस्त लावण्यात आला आहे.
पोळ्याच्या (bail pola) दिवशी खामगावात शुल्लक कारणावरून ऐन गर्दीच्या वेळेस दोन गटात तुफान दगडफेक झाली होती. या प्रकरणात खामगाव पोलिसांनी 76 जणांवर दंगलीचे गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांच्या भूमिके विरोधात भाजपा आमदार आकाश फुंडकर (mla akash fundkar) नाराजी व्यक्त करीत खामगाव शहर बंद करण्याचं आवाहन केलं हाेते.
त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज सकाळपासुन् खामगाव शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे. तसेच खामगाव शहरातील तीन पोलीस अधिका-यांना गणेश उत्सवावेळी (Ganesh Utsav 2022) बाहेर जिल्ह्यात पाठवावे अशी मागणी आमदार फुंडकर यांनी केली आहे. तसेच पोळ्याच्या दिवशी जी दगडफेक झाली त्याला जबाबदार हे पोलीस अधिकारीच असल्याचा गंभीर आरोप चक्क आमदार फुंडकरांनी केला आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.